इंदापूर : उजनी धरण प्रशासनाला अद्याप आदेश प्राप्त न झाल्याने धरणातून भीमा नदी अथवा कालव्यात पाणी सोडण्यात आलेले नाही. पाणी सोडण्यासाठी किमान दोन दिवस लागतील अशी माहिती अधिका-यांनी दिली.उजनी धरणाजवळच्या भीमा नदीच्या पात्रातील पाणी आटल्याने नदीकाठच्या सोलापूर व पुणे जिल्ह्यातील शेतीच्या पाण्याची स्थिती गंभीर झालेली आहे. पिके जळू लागली आहेत. लाखो मासे तडफडून मृत्युमुखी पडत आहेत. या संदर्भात गेल्या दोन आठवड्यांपूर्वी ह्यलोकमतह्ण सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर आमदार, माजी मंत्र्यांनी पाठपुरावा करत भाटनिमगावच्या बंधा-याची दुरुस्ती करावी, त्यामध्ये पाणी सोडावे अशी मागणी केली होती.त्या अनुषंगाने जलसंपदा मंत्र्यांनी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्याचे आदेश दिले होते. पाणी सोडण्यात येईल या आशेने गेल्या आठवडाभरात नदीकाठ व कालव्या लगतच्या शेतक-यांनी धावपळ करत वीज पंपांची दुरुस्ती करुन घेतली. जलवाहिन्यांची फुटतूट नजरेखालून घालत, त्यांची ही डागडुजी करुन घेतली. पण आत्ता पाणी सोडण्यास आणखी दोन दिवस लागणार असल्याने शेतकरी धरणाकडे डोळे लावून बसले आहेत.मुंबईमध्ये मंत्रालय स्तरावर झालेल्या बैठकीमध्ये भिमा-सिना बोगद्यातून तर १५ मार्चपासून कालवा व नदीला पाणी सोडण्याचा आदेश जारी करण्यात आले होते. उन्हाळी हंगामाकरीता शेतीला दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित झाले.उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीची मागणी जोर धरू लागली होती. भिमा-सिना बोगद्यातून ९०० क्युसेक्सने सिना नदीत होणारे आवर्तन बंद झाल्यानंतर पुढील २० दिवस १५० क्युसेक्स क्षमतेने प्रवाहित राहील,अशी माहिती शाखा अभियंता बी. जी. क्षीरसागर यांनी दिली आहे.याबाबत ८ मार्च रोजी मुंबईमध्ये मंत्रालय स्तरावर बैठक झाली होती. ९ मार्चपासून भिमा-सिना बोगद्यातून तर १५ मार्चपासून कालवा व नदीला पाणी सोडण्याचा आदेश जारी करण्यात आले होते.उन्हाळी हंगामाकरीता शेतीला दोन आवर्तने सोडण्याचे निश्चित झाले. १५ मार्चपासून कालवा व नदीला सोडलेले पाणी २० एप्रिलपर्यंत पहिले आवर्तन असणार आहे.१५ मे पासून दुसरे आवर्तन सुरु होणार आहे. ते ३० ते ३५ दिवस राहणार आहे. ११ जानेवारीला कालव्याला सोडलेले पाणी साधारणपणे २५ दिवस तर नदीला १९ जानेवारीला सोडलेले पाणी दहा ते बारा दिवस राहिले.परंतू उन्हाळी हंगामासाठी पाणीपाळीची मागणी जोर धरू लागली होती. भिमा-सिना बोगद्यातून ९०० क्युसेक्सने सिना नदीत होणारे आवर्तन बंद झाल्यानंतर पुढील २० दिवस १५० क्युसेक्स क्षमतेने प्रवाहित राहील,अशी माहिती शाखा अभियंता बी. जी. क्षीरसागर यांनी दिली आहे.
आदेशाअभावी भीमा नदीला पाणी नाही, दोन दिवस आणखी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:48 AM