रेमडेसिविरच्या १००-२०० इंजेक्शनची विक्री होताच साठा संपल्याचे सांगत दुकानदार हात वर करीत आहेत. पालिका प्रशासनाकडून इंजेक्शन मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. मात्र, रेमडेसिविरचा पुरवठा योग्य होतोय का? काळाबाजार तर सुरू नाही ना? हे तपासण्याची आणि गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध विभागाकडून हालचाली होताना दिसत नसल्याचे चित्र आहे.
--//--
लसी नसल्याने ३६ केंद्रे बंद
शहरामध्ये दररोज २० ते २२ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. तीन दिवस पुरेल एवढा साठा द्यावा, अशी मागणी रुग्णालयांकडून केली जात आहे. परंतु, लसींचा तुटवडा असल्याने पालिका प्रशासनही हतबल झाले आहे. शहरातील ९४ केंद्रांवर लसीकरण सुरू होते. मात्र, ३६ ठिकाणची केंद्र लसीअभावी बंद ठेवण्यात आली होती.
----