पुणे, : एखाद्या व्यक्तीने वकिलावर हल्ला करण्याबरोबरच त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणात आरोपीला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याची तरतूद नसावी तसेच तसेच ज्या वकिलाने तक्रार केली आहे, त्याचे म्हणणे एकूण घेतल्याशिवाय आरोपीने केलेल्या कोणत्याही अर्जावर युक्तिवाद व निर्णय घेतला जाऊ नये, अशी देखील तरतूद करण्याची मागणी अॅड. आशिष पाटणकर आणि अॅड. हृषीकेश सुभेदार यांनी बार कौन्सिल आॅफ इंडियाकडे केली आहे.
वकिलांवर वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल २०२१’ बार कौन्सिल आॅफ इंडियाकडून तयार करण्यात येत आहे. त्यावर वकिलांकडून सूचना मागविण्यात आल्या आहेत. त्यात अॅड. पाटणकर आणि अॅड. सुभेदार यांनी संबंधित आरोपीला अटकपूर्व जामिनाला अर्जच करता येणार नाही, अशी तरतूद प्रस्तावित विधेयकामध्ये करावी, अशी मागणी केली आहे.
-----------------------------