पुणे : गिरीप्रेमीने तिबेट मार्गे जगातील सहाव्या क्रमांकाच्या उंचीचे चोयो (८२०१ मी.) शिखर सर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याच्या सरावासाठी मी नेपाळला गेलो होतो. पशुपतिनाथाचे दर्शन घेऊन तेथील एका शेर्पा मित्राची भेट घेतली व सहकाऱ्यांना आणण्यासाठी एअरपोर्टला चाललो होतो... तितक्यात भूकंपाचा धक्का बसला... तेव्हा गाडी रस्त्यात होती... तत्काळ गाडीतून बाहेर उतरुन मोकळ्या जागेत गेलो, असा अनुभव गिरीप्रेमीचे उमेश झिरपे यांनी सांगितला. गिरीप्रेमी संस्थेने जगातील १४ सर्वोच्च गिरीस्थानावर चढाई करण्याची मोहिम आखली आहे. त्या अंतर्गत चोयो या शिखरावर येत्या आॅगस्ट-सप्टेंबर मध्ये मोहिम आखण्यात येणार आहे. त्यापूर्वीच्या तयारीसाठी झिरपे नेपाळला गेले होते. तसेच त्यांच्या संस्थेचा एक संघ देखील ट्रेकींगसाठी नेपाळमध्ये दाखल होणार होता. या विषयी माहिती देताना झिरपे म्हणाले, मी पत्नी अंजना व मुला यश याच्या सोबत पशुपतीनाथ मंदिरात गेलो होते. तेथून येताना आम्ही काठमांडू जवळील बौद्धा या गावी शेर्पा पासंग यांना भेटायला गेलो. अनेक मोहिमांत त्यांनी मला साथ दिली आहे. त्यांना भेटून एअरपोर्टच्या दिशेने जाण्यासाठी आम्ही टॅक्सी केली. मात्र रस्त्यातच भूकंपाचे धक्के जाणवू लागले. चालकाने गाडी थांबविली. आम्ही टॅक्सीतून उतरुन मोकळ््या जागेकडे धावलो. या सदस्यांत गिरीप्रेमी संस्थेचे श्रेया भोसले, रौनक जैन, स्मित सपारिया, अंरिजय चक्रवलकर, स्वर्णिमा पांडे, ऋषभ सपारिया, शरयू मिरजकर, अशिष माने हे पुण्याचे सदस्य व मुंबईची गौतमी बर्वे, स्वत: उमेश झिरपे, पत्नी अंजना व मुलगा यशचा समावेश होता. (प्रतिनिधी)गिरीप्रेमीचे सदस्य मदतीसाठी नेपाळला ४नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या व गिर्यारोहकांच्या मदतीसाठी गिरीप्रेमीचा दहा जणांचे पथक नेपाळला जाणार आहे. त्यात भूषण हर्षे, विशाल कडूसकर, सुमित मांदळे, अक्षय पत्की, टेकराज अधिकारी, रुपेश खोपडे, आनंद माळी, दिनेश कोतकर, गणेश मोरे, उमेश झिरपे यांचा समावेश आहे. त्यातील खोपडे, माळी व कोतकर हे तिघे १ मे रोजी रवाना होणार असून, उर्वरीत सदस्य बुधवारी रवाना झाले. ४गिर्यारोहणाचा हंगाम सुरु झाला असल्याने अंदाजे तीन ते चार हजार ट्रेकर्स या परिसरात अडकले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. ट्रेकर्सला मदत करण्याबरोबरच, जखमींची सुश्रुशा करणे व त्यांना मानसिक आधार देण्याचे काम करण्यात येईल. स्थानिक शेर्पा एजन्सीच्या मदतीने हे काम करणार आहे. त्यासाठी वॉकीटॉकी, जीपीएस यंत्रणा टेन्ट असे साहित्य बरोबर घेऊन जात असल्याचे झिरपे यांनी सांगितले. धक्का काहीसा शांत झाल्यानंतरचे चित्र विदारक होते. रस्त्याला अनेक ठिकाणी भेगा पडलेल्या. काही भेगांची जाडी खूप मोठी होती. तर काही ठिकाणी रस्ता खचलेला होता. तेथून त्रिभुवन इंटरनॅशनल एअरपोर्ट साधारण तीन ते साडेतीन किलोमीटर अंतरावर होते. आमच्या प्रमाणेच अनेकांनी गाड्या रस्त्यावरच सोडून पायी चालणे पसंत केले होते. पायीच आम्ही एअरपोर्टला गेलो. तेथे नुकतेच गिरीप्रेमीचे ट्रेकर्स पोचलेले होते. तेथून सर्वांना घेवून गाडीने भारत-नेपाळ सीमेपर्यंतचा प्रवास केला. तेथून मंगळवारी दुपारी दीड वाजता लखनौला पोचलो. त्यानंतर नंतर रात्री आठ वाजता पुण्यात लोहगाव विमानतळावर सर्व सदस्य सुखरुप पोहोचले. - उमेश झिरपे, गिरीप्रेमी
रस्त्यात असतानाच भूकंप आला
By admin | Published: April 29, 2015 11:07 PM