पुणे : विदर्भात काही ठिकाणी अतिउष्णतेची लाट आहे. तसेच कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात, तर विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ राज्यात सर्वाधिक कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे ४७़४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून येत्या ४८ तासांत त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे़ गेल्या २४ तासांत कर्नाटक किनारपट्टी, दक्षिण कर्नाटक येथील बहुतांशी ठिकाणी, तसेच केरळात अनेक ठिकाणी पाऊस झाला़उत्तर प्रदेश, रायलसीमा या भागात मोजक्या ठिकाणी, तर आंध्र प्रदेश किनारपट्टी, तेलंगणा, तामिळनाडू, उत्तर कर्नाटकातील तुरळक ठिकाणी पाऊस पडला़पुढील चार दिवस गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ विदर्भ, मध्य प्रदेशातील एक ते दोन ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे़चंद्रपुरात उष्माघाताचा बळीचंद्रपूर : राजुरा तालुक्यातील विरुर (स्टे.) येथील इंदिरानगर वॉर्डातील गंगाधर पत्रू चांदेकर (५८) यांचा रविवारी सकाळी अचानक मृत्यू झाला. उष्माघातानेच मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शनिवारी चंद्रपूर जिल्ह्यावर सूर्य कोपला होता. त्यातच चांदेकर शनिवारी एका लग्न समारंभात सहभागी झाले. उन्हामुळे प्रकृती बिघडल्याने ते घरी परतले.राज्यातील प्रमुख शहरांमधील कमाल तापमान (अंश सेल्सिअस)पुणे ३८़२, लोहगाव ३९़९, जळगाव ४४, कोल्हापूर ३३़२, महाबळेश्वर ३०़८, मालेगाव ४४़८, नाशिक ३९़३, सांगली ३४़४, सातारा ३६़४, सोलापूर ४०़६, मुंबई ३४़७, सांताक्रुझ ३५़४, अलिबाग ३३़९, रत्नागिरी ३३़७, पणजी ३३़२, डहाणू ३६़२, उस्मानाबाद ४२़८, औरंगाबाद ४१़७, परभणी ४५, नांदेड ४३़५, अकोला ४४़६, अमरावती ४४़८, बुलडाणा ४१़६, ब्रह्मपुरी ४७़५, चंद्रपूर ४७़२, गोंदिया ४४़३, नागपूर ४६़२, वर्धा ४५़८, यवतमाळ ४४़६़
विदर्भात अतिउष्णतेची लाट कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2018 12:35 AM