शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

पुणे शहरातील गणेशोत्सवात नव्हते एकही '' विनापरवाना '' मंडळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 12:27 PM

पूर्ण उत्सव काळात एकही बेकायदा मंडप आढळला नाही...

ठळक मुद्देपालिका प्रशासनाचा अहवाल : गतवर्षीच्या तुलनेत मंडपांची संख्या घटल्याची माहितीपालिकेकडे 1 हजार 996 मंडळांनी ऑनलाईन आणि 135 मंडळांनी ऑफलाईन अर्ज

पुणे : गणेशोत्सवामध्ये बेकायदा मंडपांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने तपासणी पथक नेमले खरे... परंतू या पथकाला पूर्ण उत्सव काळात एकही बेकायदा मंडप आढळला नाही. त्याउलट गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 250 मंडप कमी झाल्याचा अहवालच प्रशासनाने तयार केला असून या अहवालात एकाही मंडळावर कारवाईची शिफारस न करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिकेने मंडप धोरण स्विकारलेले आहे. या धोरणानुसार, सार्वजनिक मंडळांना सार्वजनिक रस्ते, पदपथ, पादचारी मार्गांसह चौकांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात उत्सवकाळासाठी मंडप, कमानी, रनिंग मंडपाची परवानगी दिली जाते. ही परवानगी देताना स्थानिक पोलिसांसह वाहतूक शाखेचीही परवानगी दिली जाते. त्यासाठी पालिकेत एक खिडकी योजनाही राबविली जाते. पालिकेने गणेशोत्सवाच्या दोन महिने आधीच ऑनलाईन परवाने द्यायला सुरुवात केली होती. पालिकेकडे 1 हजार 996 मंडळांनी ऑनलाईन आणि 135 मंडळांनी ऑफलाईन अर्ज केले होते. ही संख्या गेल्यावर्षीच्या तुलनेत घटली आहे. मंडळांचे मंडप नियमानुसार आहेत की नाही, पालिकेने दिलेले परवाने दर्शनी भागात आहेत की नाही, अधिकृत-अनधिकृत मंडप आहे का हे तपासण्यासाठी तपासणी पथके शासनाच्या परिपत्रकानुसार नेमण्यात आली होती.क्षेत्रीय कार्यालय स्तरावर नेमण्यात आलेल्या या पथकांमध्ये क्षेत्रीय कार्यालयाचा एक, स्थानिक पोलीस ठाणे आणि वाहतूक पोलिसांचा एक प्रतिनिधीचा समावेश करण्यात आला होता. या पथकांच्या तपासणीमध्ये दोषी आढळलेल्या मंडळाविरुध्द कारवाईची शिफारस जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाणार होती. परंतू, शहरामध्ये असा विनापरवाना एकही मंडप पथकांना आढळून आला नाही. तसा अहवालच प्रशासनाने तयार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे मंडळांचे कार्यकर्ते सुधारले आहेत की प्रशासनाने केवळ दिखाऊपणा केला आहे असा प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस मंडळांची संख्या वाढत असतानाच मंडपांची संख्या कमी झाल्याचा दावा फोल असल्याची टिका होऊ लागली आहे. 

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाGanesh Mahotsavगणेशोत्सव