शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

नळाला येणाऱ्या पाण्याची होते ‘अशी’ तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 4:10 AM

तासाला बारा नमुन्यांच्या चाचण्या : रसायने, धातू, कीटकनाशकांची तपासली जाते मात्रा लक्ष्मण मोरे / पुणे : महापालिकेच्या नळाला येणारे ...

तासाला बारा नमुन्यांच्या चाचण्या : रसायने, धातू, कीटकनाशकांची तपासली जाते मात्रा

लक्ष्मण मोरे / पुणे : महापालिकेच्या नळाला येणारे पाणी कितपत शुद्ध असते, त्याची गुणवत्ता काय याबद्दल अनेकांना शंका असतात. पिण्यासाठी ‘बॉटल्ड वॉटर’ विकत घेण्याचे ‘फँड’ वाढत चालले असताना पालिकेच्या नळाचे पाणी प्यायला वापरणे आर्थिक मागासलेपणाचे लक्षण मानले जाण्यापर्यंतही काहींची मजल गेली आहे. दुसरीकडे पुण्याच्या पाण्याच्या दर्जाचे दाखले राज्यभर दिले जातात. या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने महापालिकेच्या पाण्याच्या दर्जाचा आढावा घेतला असता पाणी शुद्ध आणि पिण्यालायक करण्यासाठी अनेक चाचण्या घेतल्या जात असल्याचे स्पष्ट झाले.

खडकवासला धरणातून येणारे पाणी पालिकेच्या पर्वती, लष्कर जलकेंद्रांवरुन शहरभर पोहोचवले जाते. या पुरवठा होणाऱ्या पाण्याचे नमुने तपासण्याची अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात आहे. येथे दिवसाला २५० ते ३०० म्हणजे दर तासाला सुमारे बारा पाण्याचे नमुने गोळा केले जातात. यांची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते आहे.

नागरिकांना दररोज केला जाणारा पाणी पुरवठा सुरक्षित आहे की नाही हे जाणून घेतले जाते. त्यासाठी रसायने, धातू, कीटकनाशकांची मात्रा पाण्यात किती आहे याची चाचणी भारतीय मानक ब्यूरो, जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मानकानुसार केली जाते. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारी पुणे ही राज्यातील एकमेव पालिका आहे. ‘डब्ल्यूएचओ’च्या मानकानुसार दहा हजार लोकसंख्येमागे महिन्याकाठी एक नमुना घेणे आवश्यक आहे. पुण्याची लोकसंख्या ४५ लाखांच्या घरात गृहीत धरुन ४५० नमूने महिन्याला घेणे अपेक्षित आहे. परंतु, पालिकेकडून मात्र महिन्याला ७ हजारांच्या आसपास नमुने तपासले जात आहेत.

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रावर मुख्य प्रयोगशाळा आहे. तर, लष्कर जलकेंद्रावर कमी क्षमतेची प्रयोगशाळा आहे. पुणेकरांना होणारा पाणी पुरवठा सुरक्षित असावा, त्यामधून कोणत्याही स्वरुपाचे आजार पसरु नयेत याची काळजी घेतली जाते आहे. जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये शुद्ध करण्यात आलेल्या पाण्याचेही नमुने तपासले जातात. त्यामुळे पाण्याची गुणवत्ता राखली जात आहे.

चौकट

कसे करतात नमुने गोळा?

पालिकेचे कर्मचारी वेगवेगळ्या भागातून पाण्याचे नमुने गोळा करतात. घरोघरी केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या नळ कोंडाळ्यावरुन नमुने घेतले जातात. तसेच पाण्याच्या टाक्यांमधील आणि जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये येणारे आणि शुद्धीकरणानंतर बाहेर सोडल्या जाणाऱ्या पाण्याचेही नमुने घेतले जातात. गेल्या वर्षभरात तब्बल ८४ हजार ९४२ नमुन्यांची तपासणी घेण्यात आली.

चौकट

नमुन्यांची कशी होते तपासणी?

पाण्याची तपासणी करताना आवश्यक घटक आणि अनावश्यक घटकांचे प्रमाण मुख्यत्वे पाहिले जाते. पाणी शुद्ध करण्यासाठी क्लोरिन, ब्लिचिंग पावडर, तुरटीसह वापरण्यात येणाऱ्या अन्य रसायनांचे प्रमाण यांत्रिक पद्धतीने तपासले जाते. पाण्यात आढळून येणारे आर्सेनिक, झिंक, जस्त, लोह आदी २१ प्रकारच्या धातुंचे प्रमाण अत्याधुनिक यंत्रसामुग्रीच्या मदतीने तपासले जाते. पिण्याच्या पाण्यात या धातुंचे प्रमाण किती असले पाहिजे याचे निकष ठरलेले आहेत. या निकषात पाणी आहे की नाही याची चाचणी केली जाते. सोबतच पाण्यातील ‘टोटल ऑर्गेनिक कार्बन’, पाण्याची ‘टर्बिडीटी’ अर्थात गढुळता आणि पाण्यातील जिवाणूंचे प्रमाण हेही निकषांप्रमाणे असल्याचे पाहिले जाते.

दररोज घेतल्या जाणाऱ्या नमुन्यांचे आणि त्याच्या तपासणीची नोंद केली जाते. त्याचे ‘रेकॉर्ड’ जतन केले जाते. पाणी दुषित असल्याच्या तक्रारी आल्यास संबंधित विभागातील जलवाहिन्या, पाणी पुरवठा केंद्रांच्या मुख्य स्त्रोताची तपासणी करुन पाणी दुषित होण्याचे कारण शोधून ते दुरुस्त केले जाते.

चौकट

येथून घेतात नमुने

नळ कोंडाळे २५०

पाण्याच्या वितरण टाक्या ६०

जल शुद्धीकरण केंद्र ०९

चौकट

हे महत्त्वाचे

* इंडीयन स्टँडर्ड ‘आयएस १०५००/२०१२’ मानकानुसार पाणी पुरवठा

* पाण्याच्या टाक्या आणि शुध्दीकरण केंद्र वाढल्याने गढूळ पाण्याच्या तक्रारी कमी

* पाण्यातील किटकनाशकांचे प्रमाण ‘निरी’ येथून आणि किरणोत्सर्जन करणाऱ्या पदार्थांची तपासणी भामा ऑटोमिक सेंटरमधून वर्षातून एकदाच केली जाते.

चौकट

पुण्याचे पाणी शुद्ध

“पर्वती जलकेंद्रावर पाण्याचे नमुने तपासणारी राज्यातील अत्याधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. दिवसाला शेकडो नमुन्यांंची तपासणी याठिकाणी होते. हे केंद्र तांत्रिकदृष्ट्या आणखी अद्ययावत करण्याचे आणि अन्य जलशुद्धीकरण केंद्रांवर अशा प्रयोगशाळा सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पुणेकरांना शुद्ध पाणी पुरवण्यात या प्रयोगशाळेचे महत्त्व मोठे आहे.”

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग