पुणे : शहरात गेल्या अकरा दिवसात सातव्यांदा एकही कोरोनाबधिताचा (Corona Virus) मृत्यू न होण्याची दिलासादायक दिवस आला आहे. रविवारी ३१ ऑक्टोबरला दिवसभरात ७१ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर ७९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शहरातील विविध तपासणी केंद्रांवर दिवसभरात ५ हजार २३९ संशयितांची तपासणी करण्यात आली असून, तपासणीच्या तुलनेत कोरोनाबधितांची संख्या केवळ १.३५ टक्का इतकी आहे.
पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने (Pune Municipal Corporation) दिलेल्या माहितीनुसार, शहरातील सक्रिय रूग्ण संख्या ७३१ आहे. तर आज पुण्याबाहेरील २ जणाचा मृत्यू झाला आहे. शहरातील गंभीर रूग्ण संख्या ही ११२ असून, ऑक्सिजनसह उपचार घेणाऱ्यांची संख्या १०४ आहे. शहरात आत्तापर्यंत ३५ लाख ५१ हजार ९२० जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ५ लाख ४ हजार २८६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ४ लाख ९४ हजार ४८१ जण कोरोनामुक्त झाले आहे. शहरात आजपर्यंत ९ हजार ७४ जणांचा मृत्यू झाला आहे.