शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

मेट्रो स्थानकांच्या दोन्ही बाजूंना असणार ‘वॉक वे’

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2018 11:57 AM

मेट्रो स्थानकांपासून दूर असणाऱ्या प्रवाशांनाही मेट्रो स्थानकांपर्यंत येणे सोपे व्हावे यासाठी हे मार्ग बांधण्यात येणार आहेत.

ठळक मुद्देपूर्व व पश्चिम पुणे जोडणार: प्रवासी वाढवण्यासाठीची व्यवस्थाडेक्कनवरील पीएमपीएल स्थानक व बालगंधर्व रंगमंदिराच्या मागे नदीपात्रात मेट्रोची स्थानके फर्ग्यूसन रस्ता ते संभाजी उद्यान असे आणखी एक मोठा वॉक वे बांधण्यात येणार शुल्क वगैरे आकारले जाणार नाही

पुणे : डेक्कन व छत्रपती संभाजी महाराज उद्यानामागील मेट्रो च्या स्थानकांलगत महामेट्रो कंपनी स्थानकाच्या दोन्ही बाजूंनी पायी चालण्याचा आकर्षक मार्ग (वॉक वे) बांधणार आहे. त्यामुळे जंगली महाराज रस्त्यावरून पश्चिम पुणे तर नदीपलीकडच्या म्हणजे पुलाची वाडी परिसरातून पूर्व पुणे मेट्रो ला जोडले जाणार आहे. त्याशिवाय फर्ग्युसन रस्त्यावरूनही थेट डेक्कन स्थानकावर येणारा एक मोठा वॉक वे बांधण्यात येणार आहे.मेट्रो स्थानकांपासून दूर असणाऱ्या प्रवाशांनाही मेट्रो स्थानकांपर्यंत येणे सोपे व्हावे यासाठी हे मार्ग बांधण्यात येणार आहेत. वनाज ते रामवाडी या मागार्चे मुख्य प्रकल्प अभियंता अतुल गाडगीळ यांनी ही माहिती दिली. डेक्कनवरील पीएमपीएल स्थानकासमोरच्या जागेत व संभाजी उद्यानात बालगंधर्व रंगमंदिराच्या मागे नदीपात्रात मेट्रोची स्थानके आहेत. ही दोन्ही स्थानके शहराच्या मध्यवर्ती भागात, मात्र गर्दीच्या ठिकाणी आहे. रस्त्यावर असणाऱ्या तसेच तिथून दूर असलेल्या ठिकाणांहूनही प्रवाशांना मेट्रोपर्यंत येण्यासाठी म्हणून हे मार्ग बांधले जाणार आहेत. त्यासाठी नदीपात्रात एकही खांब नसेल. केबल रोप या आधुनिक तंत्रज्ञानाने ते बांधण्यात येणार आहेत.डेक्कनवरील व पुलाची वाडी कडील असे दोन्ही बाजूंचे प्रवासी त्यामुळे मेट्रो ला मिळतील असे स्पष्ट करून गाडगीळ म्हणाले, या दोन वॉक वे शिवाय झाशीच्या राणीच्या पुतळ्याच्या मागील बाजूनेही एक वॉक वे प्रस्तावीत करण्यात आला आहे. तो संभाजी उद्यानातून कडेने एकाही झाडाचे नुकसान न करता संभाजी उद्यान स्थानक व डेक्कन स्थानकापर्यंत जाईल. तो मेट्रोच्या बरोबर खाली मेट्रोच्याच खांबाना धरून असेल. त्यावरून नदी पाहता येईल. तसेच तिथे वृद्धांना बसण्यासाठी बाक वगैरेही असतील.फर्ग्यूसन महाविद्यालयापासून रस्त्याने संभाजी उद्यानात येण्यास बराच वेळ लागतो. तो वाचावा व फर्ग्युसन रस्त्यावरील प्रवासीही मेट्रो ला मिळावेत यासाठी फर्ग्यूसन रस्ता ते संभाजी उद्यान असे आणखी एक मोठा वॉक वे बांधण्यात येणार आहे. हे सर्वच वॉक वे आधुनिक तंत्रज्ञानाने बांधण्यात येणार आहेत. त्यावरून चालणे सूलभ असेल. ते फक्त मेट्रोच्या प्रवाशांसाठी म्हणूनच असतील असे नाही. कोणीही त्याला वापर करू शकेल. त्यासाठी शुल्क वगैरे आकारले जाणार नाही असे गाडगीळ यांनी सांगितले.  ............कर्वे रस्त्यावरील दुहेरी उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. ते पुर्ण होण्यास साधारण दीड वर्षांचा कालावधी लागेल. तोपर्यंत वाहतूक वळवण्यासाठी वाहतूक शाखेला वाहतूक चक्राकार वळवावी किंवा एकाच बाजूने सरळ आहे तशीच ठेवावी असे दोन पर्याय सुचवले आहेत. त्यासंबधीचा निर्णय वाहतूक शाखा घेणार असून तो लवकरच जाहीर करण्यात येईल गाडगीळ यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रोdeccan gymkhanaडेक्कन जिमखानाBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर