शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

रब्बी ज्वारी, हरभऱ्याच्या क्षेत्रात होणार वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2019 10:00 PM

रब्बी ज्वारी, हरभरा आणि मक्याच्या क्षेत्रात यंदा चांगली वाढ होईल

ठळक मुद्देरब्बीच्या कामाला वेग : १५ लाख हेक्टरवरील पेरण्या उरकल्यामका, ज्वारीवर रोगाचा प्रादुर्भावलांबलेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्यांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता

पुणे : ऑक्टोबर महिना अखेरीपर्यंत लांबलेल्या पावसाने विश्रांती दिल्यानंतर रब्बी पेरण्यांच्या कामांना चांगला वेग आला आहे. राज्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र ५६ लाख ९३ हजार हेक्टर असून, त्या पैकी १५ लाख २० हजार हेक्टरवरील (२६.७० टक्के) पेरण्याच उरकल्या आहेत. रब्बी ज्वारी, हरभरा आणि मक्याच्या क्षेत्रात यंदा चांगली वाढ होईल, असा अंदाज आहे. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत यंदा जोरदार पाऊस झाला. ऑगस्ट आणि सप्टेंबरमधे जालेल्या अतिवृष्टीने पश्चिम महाराष्ट्रासह विविध ठिकाणी दाणादाण उडविली. अतिवृष्टी आणि पुरामुळे राज्यातील तब्बल ९४ लाख ५३ हजार १३९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, भात, मका, तूर, हळद, भुईमूग, नाचणी, संत्रा, डाळिंब, पपई, द्राक्ष आणि ऊस अशा विविध प्रकारच्या पिकांचा समावेश आहे. लांबलेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्यांवर त्याचा विपरित परिणाम होण्याची शक्यता होती. पावसाने उघडीप दिल्यानंतर रब्बी पेरण्यांनी वेग घेतला आहे. रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र २६ लाक ७८ हजार ५१३ हेक्टर असून, त्या पैकी १० लाख २३ हजार १६३ हेक्टरवरील (३८ टक्के) पेरण्या झाल्या आहेत. गेल्यावर्षी याच काळात ६ लाख ७६ हजार ५०५ हेक्टरवरील पेरण्याच होऊ शकल्या होत्या. सोलापूर, पुणे आणि अहमदनगर या पुणे विभागात रब्बीचे सर्वाधिक १३ लाख ५ हजार ४०७ हेक्टर क्षेत्र आहे. त्या पैकी ५ लाख ८३ हजार २८७ हेक्टरवरील पेरणीची कामे झालेली आहेत. गव्हाचे सरासरी क्षेत्र १० लाख १४ हजार ८०४ हेक्टर असून, त्या पैकी ६४ हजार ३४४ हेक्टरवरील (६ टक्क) पेरणी झाली आहे. लांबलेल्या पावसामुळे यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत निम्मा क्षेत्रावर गव्हाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. हरभºयाच्या क्षेत्रात मात्र यंदा वाढ होईल. हरभºयाचे सरासरी क्षेत्र १४ लाख ९० हजार २४७ हेक्टर असून, त्या पैकी ३ लाख ६१ हजार ६९ हेक्टरवर (२४ टक्के) पेरणी झाली आहे. मक्याचे सरासरी क्षेत्र सव्वादोन लाख हेक्टर असून, पैकी ४५ हजार ८९६ हेक्टरवरील पेरणीची (२० टक्के) कामे झाली आहेत. -----------मका, ज्वारीवर रोगाचा प्रादुर्भावपुणे, अमरावती, नागपूर विभागात काही ठिकाणी मका व ज्वारी पिकावर लष्करी अळीचा, तर, हरभरा पिकावर हेलीकोवर्पा या किडीचा आणि मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीagricultureशेतीRainपाऊस