पुणो : महापालिकेकडून शहरातील व्यावसायिकांना मीटरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठय़ावर आकारल्या जाणा:या पाणीपट्टीत 1क् ते 15 टक्के वाढ करण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांनी दिलेल्या आहेत.
15 वर्षापासून या पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने तसेच पाणीपुरवठय़ासाठी लागणारा खर्च आणि मिळणारा कर यांत मोठी तफावत असल्याने ही वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रंनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
काही दिवसांपूर्वी महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी महापालिकेच्या अंदाजपत्रकाचा आढावा घेतला असता, खर्च आणि कर यांच्यातील वाढती तफावत त्यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर त्यांनी तत्काळ मीटरद्वारे केल्या जाणा:या पाणीपुरवठय़ाच्या पाणीपट्टीमध्ये सुमारे 1क् ते 15 टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार, हा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच तो स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात येणार असल्याचे सूत्रंनी लोकमतशी बोलताना सांगितले. मात्र, यापूर्वीही अशा प्रकारे ठेवण्यात आलेल्या पाणीपट्टीच्या दरवाढीचे प्रस्ताव वेगवेगळ्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून स्थायी समितीने फेटाळलेले असून, या वेळी समिती काय निर्णय घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
शहरात सुमारे 4क् हजार मीटरधारक असून त्यांत प्रामुख्याने हॉटेल व्यावासायिकांसह इतर व्यावसायिकांचा समावेश आहे. शहरात सुमारे 4क् हजार मीटरधारक आहेत. त्यांना पुरविल्या जाणा:या हजार लिटर पाण्यासाठी केवळ 3 रुपये आकरले जातात, तर हा पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला 7 रुपयांचा खर्च करावा लागतो. त्यामुळे महापालिकेला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. त्यातच 14 वर्षापासून या पाणीपट्टीत कोणतीही वाढ केली गेलेली नसल्याने त्याचा आर्थिक बोजा महापालिकेवर पडत आहे.