शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

कायद्यात दुरुस्ती होईपर्यंत मागे हटणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 2:07 PM

मी स्वतः येत्या १० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार

आळंदी : माझे जीवन समाजासाठी अर्पण केले असून समाजालाच मायबाप मानले आहे. समाजाशी कधीही गद्दारी करणार नाही. आगामी काळातही समाजासाठीच लढणार आहे. आरक्षण भेटल्यावर मराठा समाजाचे क्लासवन आधिकारी झालेले पहायचे आहे. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायचा आहे. त्यामुळे जोपर्यंत कायद्यात दुरुस्ती होत नाही तोपर्यंत इंचभरही मागे हटणार नसल्याचे मनोज जरांगे - पाटील यांनी सांगितले.               तीर्थक्षेत्र आळंदीत मनोज जरांगे - पाटील यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी फटाक्याच्या अतिषबाजीत जरांगे पाटलांचे जंगी स्वागत करून शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान शेलपिंपळगाव, शेलगाव, वडगाव - घेनंद गावांत जरांगे पाटलांचे स्थानिकांनी स्वागत करून सत्कार केला.

 जरांगे पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. लाखोंच्या संख्येने मराठ्यांची मुलं मुबंईला गेली. जो मराठा आरक्षणासाठी कायदा लागतो. तो राज्यात सापडला आहे. त्यासाठी अधिवेशनात सगेसोयरे कायदा पारित करायचा आहे. त्यामुळे राज्यातील सर्व पक्षांतील आमदारांनी हा कायदा मंजूर होण्यासाठी मराठ्यांच्या बाजूने आवाज उठवण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. सभा संपल्यानंतर माऊलीं मंदिरात जाऊन त्यांनी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीचे  दर्शन घेतले.

मराठा बांधव व ओबीसी बांधव गावोगावी प्रेमाने वागत आहेत. एकमेकांच्या सुख दुःखात एकत्र असतात मात्र काही जण उगाचच त्यांच्यामध्ये वाद निर्माण करत आहेत. मंत्री छगन भुजबळांचे नाव न घेता मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.

प्रत्येक मतदार संघातील आमदारांना फोन करा व पत्र लिहा. येत्या १५ तारखेच्या अधिवेशनात जो सगेसोयरे कायदा आहे पारित होणार आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एकमताने आवाज उठवा. मी स्वतः येत्या १० तारखेपासून आमरण उपोषणाला बसणार आहे. आपल्याला टिकणारे आरक्षण मिळवायचे आहे.   - मनोज जरांगे पाटील.

टॅग्स :PuneपुणेManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षणAlandiआळंदीEknath Shindeएकनाथ शिंदेState Governmentराज्य सरकार