पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हटलं जात. व्हेजपासून नॉनव्हेजपर्यंत आणि डायटफूडपासून फास्टफूडपर्यंत सारं काही पुण्यात मिळतं. तेही हव्या दरात. इथे मिळणारी मॅगीही तितकीच चवदार असून दोन मिनिटात होणारी मॅगी आपल्याला पुन्हा पुन्हा या ठिकाणांना भेट द्यायला भाग पडतात.
मॅगी पॉईंट लॉ कॉलेज रस्ता :
लॉ कॉलेज रस्त्यावरील वाडेश्वरजवळ मॅगी पॉईंट नावाचे हॉटेल आहे. तिथे पंधरापेक्षा अधिक प्रकारची मॅगी मिळते. त्यात पेरिपेरी, पनीर असे आगळेवेगळे प्रकार आहेत.
वारी बुक कॅफे, कोथरूड :
पुस्तक कॅफे संकल्पना असलेल्या या निवांत कॅफेमध्ये मिळणारी मॅगी मनाला आनंद देणारी आहे. भरपूर भाज्या घालून केलेली गरमागरम मॅगी आणि सोबत मिळणारी कॉफी मनाला नवा तजेला देणारी असते.
यारी कॅफे, सेनापती बापट रस्ता :
इटालियन मॅगी ही इथली खासियत आहे. भरपूर चीज त्यात इटालियन मसाले एकत्र करून मॅगीला इटालियन फ्लेवर दिला जातो. त्यासोबत भारतीय मसाल्यांचा फ्लेवर असलेले क्रीम सर्व्ह केले जाते.
रानडे इस्टिट्यूट फर्ग्युसन रोड :
फर्ग्युसन रस्त्यावर असणाऱ्या रानडे इन्स्टिट्यूटमधल्या कॅन्टीनमध्ये मिळणारी मॅगी प्रसिद्ध आहे. चटकदार मॅगी खाण्यासाठी इथे आजही जुने विद्यार्थी आवर्जून येतात. भाज्या आणि मसाले घालून तयार केलेल्या या मॅगीसाठी एकेकाळी बाहेरच्या कॉलेजमधून विद्यार्थी येत असत.
क्रेझी चीझी, सदाशिव पेठ :
सदाशिव पेठेमधल्या खाऊ गल्लीत मिळणारी मॅगी प्रचंड चटकदार असून तिथला पेरी पेरी फ्लेवर सर्वात प्रसिद्ध आहे. तिखट पेरीपेरी आणि त्यावर किसलेले भरपूर चीज एकमेकांची चव बॅलन्स करून भन्नाट अनुभव देतात.