पुणे : पुणे शहरात फक्त पुणेरी पगडी मिळते असा जर समज असेल तर तो चुकीचा आहे. शहरातील रविवार पेठ भागात विविध पगड्या बनविणाऱ्या दुकानांमध्ये अनेक प्रकारच्या पगड्या बघायला मिळतात.
शिंदेशाही पगडी :
तुकाराम पगडी किंवा फेटा :
संत तुकाराम महाराज कायमच पांढऱ्या रंगाचा फेटा बघायचे. अतिशय साधा आणि तितकाच सात्विक दिसणारा हा फेटा डोळ्यांना भुरळ घालणारा आहे.
गायकवाड घराणे पगडी :
बडोदा येथील गायकवाड घराण्याची स्वतःची अशी विशिष्ट रचना असलेली पगडी आहे. गंमत म्हणजे गायकवाड पगडी एकसारखी नसून त्यात घराण्यातील आपआपसातील फरकांनुसार वैविध्य आढळते.
शिवाजी महाराज जिरेटोप :
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जिरेटोप तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे.आजही फक्त जिरेटोपाच्या खुणेवरून महाराजांची प्रतिमा देशविदेशातही ओळखली जाते.
फुले पगडी :
महात्मा ज्योतिबा फुले यांची फुले पगडी लाल रंगाच्या कापडाने बनवली जाते.या पगडीला कापडाव्यतिरिक्त कोणतीही सजावट केली जात नाही.
पेशवाई पगडी :
घेरदार आणि जरी काठाची सजावट करून पेशवाई पगडी सजवली जाते.ही पगडी पेशवाईच्या कालखंडात लोकप्रिय असल्याचे दाखले दिले जातात.
पुणेरी पगडी :
पुणेरी पगडी सहसा लाल रंगाची असते.ही पगडी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक परिधान करत असत.
मावळे किंवा मावळी पगडी :
मावळे किंवा मावळी पगडी ही शिवरायांच्या स्वराज्यातील सैनिक अर्थात मावळे परिधान करीत असत.ही पगडीही संपूर्ण लाल रंगात असते.
बत्ती पगडी :
देवाच्या जागरण गोंधळाच्यावेळी ही पगडी घातली जाते.ही पगडी गोंधळी किंवा देवाची पगडी म्हणूनही ओळखली जाते.