शहरं
Join us  
Trending Stories
1
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
2
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
3
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
4
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
5
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
6
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
7
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
8
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच
9
पन्नास टक्के झोपडपट्टीवासीयांची मते कुणाला? चारकोपमधून योगेश सागर यांना बुधेलिया यांचे आव्हान
10
‘कोल्ड प्ले’ तिकीट विक्री घोटाळाप्रकरणी छापेमारी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त
11
सरकारी निधी गैरवापर रोखा, समिती नेमा! राजकीय जाहिरातींप्रकरणी हायकोर्टाचे आदेश
12
बहिणीच्या अवयदानाला भावाने दिली संमती; चौघांना मिळाले जीवदान
13
‘नोटा’ला नकार : ७५ हजार मतदारांनी निवडला होता ‘नोटा’ चा पर्याय 
14
अफवेच्या तणावावर ‘थेरपी’ मुंबई विमानतळावर ‘पेट मी’ अनोखा उपक्रम 
15
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

Sharad Pawar: "आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी", जैन मुनींच्या प्रश्नाला शरद पवारांचे उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2024 10:40 AM

दगडूशेठ गणपतीला आले असताना पवारांनी मासाहार केल्यामुळे ते मंदिरात गेले नसल्याचे राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते

किरण शिंदे

पुणे : मी याआधी शाकाहारी नव्हतो, मात्र मागील वर्षभरापासून मी पूर्णतः शाकाहारी आहे असं सांगितले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar). बारामतीत जैन मुनींच्या प्रश्नाचे उत्तर देताना ते बोलत होते. मध्य प्रदेशातून बारामती येथे काही जैन मुनि आले आहेत. मंगळवारी या जैन मुनिंचे शरद पवारांनी दर्शन घेत त्यांच्याशी संवादही साधला. यावेळी एका जैन मुनींनी शरद पवारांना उद्देशून शाकाहार बद्दल तुमचे मत काय असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले, आजकाल मी शंभर टक्के शाकाहारी आहे. या आधी मी शाकाहारी नव्हतो, परंतु मागच्या वर्षभरापासून मी पूर्णतः शाकाहारी आहे. 

काही वर्षांपूर्वी शरद पवार श्रीमंत दगडूशेठ (Dagdusheth Temple) गणपतीच्या दर्शनासाठी मंदिरात येणार असल्याचे कळले होते. त्यानंतर शरद पवार श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी जाणार याचे सर्वांना कुतुहल होते. शरद पवारांनी एकदाही दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलेले नाही. या नवीन मंदिराची स्थापना झाल्यापासून पवार एकदाही मंदिरात दर्शनासाठी आल्याचेही कुणी पाहिलेले नव्हते. त्यामुळे त्यांच्या या गणेश दर्शनाची चर्चा शहरात रंगली होती. त्यानंतर शरद पवार दुपारच्या सुमारास मंदिराकडे आले पण, त्यांनी मंदिरासमोर उभे राहून लांबूनच बाप्पाचे मुखदर्शन घेणे पसंत केले. यानंतर मात्र टीका होऊ लागल्याने राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देताना पवारांनी मासाहार केल्यामुळे ते मंदिरात गेले नसल्याचे सांगण्यात आले होते. तेव्हा या संपूर्ण प्रकाराची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणvegetableभाज्याfoodअन्नDagdusheth Templeदगडूशेठ मंदिर