पुणे : पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हंटले जाते. देशभरातून विद्यार्थी पुण्यात शिक्षणासाठी येत असतात. शिक्षणाच्या व नाेकरीच्या विविध संधी येथे असल्याने साहजिकच तरुणांचा अाेढा हा पुण्याकडे असताे. त्यातही पुण्यातील वातावरण हे शिक्षणासाठी पूरक अाहे. त्यामुळे दरवर्षी ही संख्या वाढत चालली अाहे. याच पुण्याने देशातील अनेक अधिकारी घडवले अाहेत. पुण्यातल्या सदाशिव अाणि नारायण या दाेन पेठा स्पर्धा परिक्षांचे हब म्हणून उदयास येत असून या दाेन पेठांमध्ये हजाराे विद्यार्थी स्पर्धा परिक्षांची सध्या तयारी करत अाहेत. स्पर्धा परिक्षांचा निकाल लागला की टाॅपर विद्यार्थ्यांमध्ये पुण्यात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या क्रमांक असताेच असताे. पुण्यात स्पर्धा परिक्षांसाठीचे मार्गदर्शन करणारे शेकडाे क्लासेस अाहेत. त्याचबराेबर विद्यार्थ्यांसाठीच्या अभ्यासिका या जवळपास 150 च्या अासपास अाहेत. खास करुन पुण्यातला मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव व नारायण पेठेत सर्वाधिक अभ्यासिका व स्पर्धा परिक्षांची मार्गदर्शन करणारे क्लासेस अाहेत. सध्या पुण्यामध्ये स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे अडीच लाख विद्यार्थी असून या दाेन पेठांमधली संख्या जवळपास लाखाच्या अासपास अाहे. साहजिकच राज्याच्या कानाकाेपऱ्यातून स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या पेठा अाता खुनावत अाहेत. गेल्या काही वर्षात या पेठा जसजश्या स्पर्धा परिक्षांचे केेंद्र म्हणून उदयास येऊ लागल्या येथील अर्थकारणही विद्यार्थी केंद्री व्हायला सुरुवात झाली. या पेठांमध्ये विविध अभ्यासिकांबराेबरच विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या किंमतीत जेवण देणाऱ्या अनेक खाणावळी सुद्धा अाहेत. तसेच विद्यार्थ्यांची गरज अाेळखून येथे नाश्तासाठीची अनेक ठिकाणे तयार झाली अाहेत. स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासिका सकाळी 7 पासून ते रात्री 11 वाजेपर्यंत खुल्या असतात. त्याचबराेबर जे विद्यार्थी नाेकरी करुन स्पर्धा परिक्षांची तयारी करत अाहेत त्यांच्यासाठी असलेल्या रात्रीच्या अभ्यासिकांची संख्याही अाता वाढत अाहे. अभ्यासासाठीचं पाेषक वातावरण, जेवणाची हाेणारी साेय, मिळणारं याेग्य मार्गदर्शन या कारणांमुळे राज्यातील बहुतांश मुले पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करत अाहेत. गेल्या पाच वर्षांपासून पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारा मुळचा अहमदनगचा असलेला निलेश निंबाळकर म्हणाला, पुण्यातील सदाशिव व नारायण या दाेन पेठा स्पर्धा परिक्षांचे केंद्र म्हणून उदयास येत अाहेत. खेड्यापाड्यातून अालेले लाखाे विद्यार्थी येथे स्पर्धा परिक्षांची तयारी करत अाहेत. या ठिकाणच्या अभ्यासिकांमध्ये असलेलं वातावरण अाणि मिळणारं मार्गदर्शन राज्यातील इतर ठिकाणी मिळत नसल्याने साहजिकच विद्यार्थी पुण्यात तयारीसाठी येतात. त्याचबराेबर या पेठांच्या जवळच विद्यार्थ्यांची राहण्याची व जेवणाची कमी पैशात साेय हाेत अाहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अापल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत करता येते.
पुण्यातल्या या पेठा घडवतात देशातील अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 12:21 PM
पुण्यातल्या सदाशिव व नारायण या पेठा स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे केंद्र म्हणून उदयास येत असून हजाराे विद्यार्थी या ठिकाणी स्पर्धा परिक्षांची तयारी करीत अाहेत.
ठळक मुद्देअडीच लाख विद्यार्थी पुण्यात करतात स्पर्धा परिक्षांची तयारीरात्रीच्या अभ्यासिकांच वाढतीये संख्या