पुणे : पुण्यातील मराठी संस्कृती जशी जगभर प्रसिद्ध अाहे, तशीच पुण्यातील स्कार्फ संस्कृतीही तितकीच प्रसिद्ध अाहे. पुण्यातील कुठल्याही रस्त्यावरुन तुम्ही जात असाल तर तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडेल की पुण्यात नेहमीच मुली गाडीवर स्कार्फ बांधतात तरी का ? याच प्रश्नाचं उत्तर अाम्ही पुण्यातील मुलींशी बाेलून शाेधण्याचा प्रयत्न केला. त्यात धुळीपासून संरक्षणासाठी हा स्कार्फ वापरला जात असला तरी पुण्यात स्कार्फ बांधला नाहीतर अपुर्ण वाटत असल्याची भावना तरुणींनी व्यक्त केली. पुणेरी पाट्या, पुणेरी संस्कृती, पुण्याचं फूड जितकं फेमस अाहे. तितकीच पुण्याची स्टाईलही फेमस अाहे. पुण्यातील बहुतांश मुली या दुचाकीवरुन प्रवास करताना किंवा बसमधून प्रवास करत असताना स्कार्फचा वापर करतात. स्कार्फ नाही बांधला तर अनेक तरुणींना अपुर्ण वाटतं. गाडीवरु जाताना गाडीचा ब्रेक जितका महत्त्वाचा अाहे तितकंच महत्त्वाचं गाडीवरुन जाताना स्कार्फ बांधणं मुलींसाठी अहे. याबाबत गाैरी म्हणाली, सध्या पुण्यात उन्हाचा कडाका खूप असताे. गाडीवरुन जात असताना उन्हामुळे टॅन हाेऊ नये म्हणून स्कार्फ वापरला जाताे. त्याचबराेबर वाऱ्यामुळे केस खराब हाेऊ नयेत, तसेच मेकअपही खराब हाेऊ नये म्हणून स्कार्फचा वापर केला जाताे. मुग्धा म्हणते, पुण्यातील प्रदूषण वाढतंय, झाडांची संख्याही कमी हाेतीये. त्यामुळे या प्रदूषणाचा गाडीवरुन जाताना खूप त्रास हाेताे. या प्रदूषणापासून चेहऱ्याचं संरक्षण व्हावं, तसेच वाऱ्याबराेबर येणारी धुळ चेहऱ्यावर बसू नये यासाठी स्कार्फचा वापर केला जाताे. एेश्वर्याचं म्हणंण वेगळं अाहे. आपण मित्रासाेबत असताना काेणी अापल्याला अाेळखू नये यासाठी सुद्धा मुली स्कार्फ वापरतात असं तिंच म्हणंण अाहे. त्याचबराेबर सवयीमुळे सुद्धा स्कार्फ बांधत असल्याचे ती म्हणते. रुपाली म्हणते स्कार्फ बांधणं हा पुण्यातील एक परंपराच झाली अाहे. बहुतांश मुली बाहेर पडताना स्कार्फ बांधतात. त्याची कारणं वेगवेगळी असली तरी स्कार्फ हा बांधला जाताेच. देविका म्हणाली, स्कार्फची अाता सवय झाली अाहे. उन्हापासून, धुळीपासून संरक्षण व्हावं हा जरी त्यातील एक भाग असला तरी स्कार्फ बांधणं हा अाता पुण्याच्या परंपरेचा एक भाग झाला अाहे. काही मुलींना असुरक्षितता वाटते म्हणूनही त्या स्कार्फचा वापर करतात. रात्रीच्यावेळी उशीरा गाडी चालवत असेल तर काेणी अाेळखू नये, काेणी वाईट नजरेने पाहू नये म्हणूनही स्कार्फ वापरल जाताे. मधुरा म्हणते पुणेकरांना मुलींना स्कार्फमध्ये पाहण्याची इतकी सवय झाली अाहे की एखाद वेळेस गाडीवरुन जाताना स्कार्फ बांधायचा राहिला तर मित्र सुद्धा अाठवण करुन देतात. मी अकरावीत असल्यापासून स्कार्फ बांधायला सुरुवात केली. त्यावेळी माझ्या माेठ्या बहिणीने स्कार्फ कसा बांधायचा हे मला शिकवलं हाेतं. गाडीवर स्कार्फ बांधणं ही अाता पुण्यातील परंपराच झाली अाहे.
...म्हणून पुण्यात मुली नेहमी वापरतात स्कार्फ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 4:13 PM