पुणे: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व जगदगुरू तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्ताने पालखी मार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद राहणार असून, पुणे वाहतुक शाखेतर्फे पर्यायी मार्गांचा अवलंब करण्याच्या सूचना नागरिकांना करण्यात आल्या आहेत. १२ जून रोजी पहाटे २ वाजल्यापासून गरजेनुसार काही रस्ते बंद करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी कळवले आहे.
संत तुकाराम महाराज पालखी बोपोडी चौकात पोहोचेपर्यंत...
वाहतूकीसाठी बंद असलेले रस्ते - पर्यायी मार्ग- बोपोडी चौक ते खडकी बाजार - अंतर्गत रस्त्याने चर्च चौक - चर्च चौक - भाऊ पाटील रोड - ब्रेमेन चौक - औंध मार्गे - पोल्ट्री फार्म चौक - रेल्वे पोलिस मुख्यालयासमोरून औंध रोड - ब्रेमेन चौक - मुळा रोड ते कमल नयन बजाज उद्यान चौक - अंतर्गत रस्त्याचा वापर करावा
पालखी इंजिनिअरिंग कॉलेज चौक पोहोचेपर्यंत..
वाहतूकीसाठी बंद असलेले रस्ते - पर्यायी मार्ग - जुना मुंबई-पुणे मार्गावरून पुण्याकडे येणारी सर्व प्रकारची वाहने बंद करण्यात येतील - बोपोडी चौकातून पुणे/मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनी भाऊ पाटील रोडवरून औंध मार्गे ब्रेमेन चौकातून इच्छितस्थळी जावे - आरटीओ ते इंजिनिअरिंग कॉलेज चौक - १) आरटीओ चौक - शाहीर अमर शेख चौक - कुंभार वेस चौक २) आरटीओ चौक - जहांगीर चौक - आंबेडकर सेतू ते गुंजन मार्गे - सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट चौक - पर्णकुटी चौक - बंडगार्डन ब्रीज - महात्मा गांधी चौक मार्गेसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी आगमन दरम्यान बंद असलेले रस्ते व पर्यायी मार्ग..
वाहतूकीसाठी बंद असलेले रस्ते - पर्यायी मार्ग - कळस फाटा ते बोपखेल फाटा / विश्रांतवाडी चौक - धानोरी रोडने व अंतर्गत रोडने - मेंटल हॉस्पीटल कॉर्नर ते पाटील इस्टेट रोड - जेल रोड, विमानतळ रोड मार्गे - सादलबाबा दर्गा ते पाटील इस्टेट रोड - पर्णकुटी चौक - गुंजन चौक - जेल रोड - ग`रीसन इंजिनिअरिंग चौक - विश्रांतवाडी चौक - चंद्रमा चौक ते आळंदी रोड, नवीन आंबेडकर सेतू ते चंद्रमा चौक बंद, होळकर ब्रीज ते चंद्रमा चौक आणि होळकर ब्रीज ते साप्रस चोकी बंद - या साठी अंतर्गत रस्त्यांचा वापर करावा.