पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवारांची महाराष्ट्रातून जनसन्मान यात्रा सुरु आहे. अशातच अजितदादांनी जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा होण्यास सुरुवात आली. या यात्रेतून सगळीकडे जाताना महिला अजितदादांना भावाच्या नात्याने राखी बांधून आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. जनसन्मान यात्रा आज जुन्नर तालुक्यातून जाताना एका महिलेने विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांनी उत्तर देताना उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय.
लग्न झाल्यापासून माझ्या बायकोने इतका हात ओढला नसेल तेवढा या महिलांनी माझा हात ओढला. पण, काय सांगायचं. बहिणीच्या नात्याने त्यांनी माझा हात ओढला त्या माझ्या बहीणी आहेत. माझ्या माय माऊली आहेत. त्यांना आज आंनद झाला आहे. आम्हाला उत्साह का येतो त्याच कारण म्हणजे, इतक्या महिला भगिनी येतात. त्या आम्हाला राख्या बांधतात. राखी बांधताना मी त्यांना विचारायचो, माऊली पैसे आले का? त्यावर त्या म्हणायच्या हो दादा काल पैसे जमा झाले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. काही म्हणाल्या अजून आले नाहीत, पण येतील. पण येतील. आम्ही शब्दांचे पक्के आहोत, असंही यावेळी अजित पवार म्हणाले आहेत.
माय माऊलींना फसवणार नाही तसेच फसवेगिरी करणार नाही
रक्षाबंधन सनापूर्वी दीड कोटी महिलांच्या खात्यामध्ये माझी लाडकी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. महायुती सरकार शब्द पाळणारे असून आम्ही ही योजना बंद करणार नाही. योजना थांबवायची ही चालवायची हे तुमच्या हातात आहे. घड्याळ, धनुष्यबाण व कमळ यांना पाठिंबा दिला तर योजना चालू राहील. दोन ते अडीच कोटी महिलांना योजनेचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे. योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असताना विरोधक चुनावी जुमला असल्याचा आरोप करतायेत. मात्र आम्ही माय माऊलींना फसवणार नाही तसेच फसवेगिरी करणार नाही. अनेक सभा पाहिल्या मात्र एवढ्या प्रचंड संख्येने महिला आज पाहतो आहे. आमच्यावर भावाच्या नात्याने महिलांनी विश्वास ठेवावा असेही पवार म्हणाले.
तुम्ही अर्ज केला; पण पैसे नाही आले, मग काय कराल?
- तुम्ही नारीशक्ती ॲप किंवा लाडकी बहीण योजना पोर्टलवरून अर्ज केला आहे. तो मंजूर झाला आहे; पण पैसे बँक खात्यात जमा झाले नसतील तर आपले बँक खाते आधारकार्डशी लिंक केले आहे का? हे तपासावे.- आपल्या मोबाइलवर अर्जातील त्रुटींबाबत काही मेसेज आला आहे का, हे पाहावे.- त्रुटींची पूर्तता करून अर्ज पुन्हा सबमिट करावा.- आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झालेत का? ते तपासावे.