याप्रकरणी पोलीस नाईक नितीन पोपटराव सुद्रीक यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अरीफ सुभान अक्कलकोटकर (वय ४९, रा. थेऊर) याला अटक करण्यात आली आहे. अर्जदार सतीश हिरालाल सुराणा यांनी अक्कलकोटकर विरुध्द तक्रारी अर्ज दिला होता. पोलीस निरीक्षक बंडगर यांनी याकडे विशेष लक्ष देऊन अर्जदारांची अडचण सोडवा, असा शेरा मारून तो चौकशीसाठी सुद्रीक यांच्याकडे दिला होता.
शुक्रवारी (दि १२) सांयकाळी ६ च्या सुमारास सुद्रीक हे थेऊर येथे गणवेशात खासगी वाहनाने गस्त करीत असताना. त्यांना अर्जदार सतीश सुराणा यांचा फोन आला. त्यांनी अक्कलकोटकर याने पुन्हा आमच्या गड्यांना शिवीगाळ करत असल्याचे सांगितले. त्यांनतर सायकाळी ६.१५ च्या सुमारास अक्कलकोटकर हा बसस्टॉप जवळ भेटला. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध तक्रार अर्जाचे सांगितले. तुमच्या जवळील कागदपत्र घेऊन पोलीस ठाण्यात हजर राहा असे सांगत सुद्रीक यांनी लेखी समजपत्र दिले.
अक्कलकोटकर याने ते फाडून टाकले. सुद्रीक यांनी हा गुन्हा असल्याचे सांगितले. यावेळी अक्कलकोटकर यांने मी घाबरत नाही असे म्हणत सुद्रीक यांना शिवीगाळ करू लागला. काही वेळाने सद्रीक यांची कॉलर पकडून त्यांना खाली पाडून डोक्यात दगड मारून जखमी केले. तेथे जमलेल्यापैकी राहुल गायकवाड (रा. थेऊर) याने सहाय्यक फौजदार अनिल कोळेकर यांना फोन केल्याने ते व पोलीस हवालदार पाटसकर अतुल लगेच तेथे आले. त्यांनी सुद्रीक यांची अक्कलकोटकर याचे ताब्यातुन सुटका केली.