पुणे : शेअर मार्केट ट्रेंडिंगच्या दोघांना साडेतेवीस लाखांना गंडवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वानवडी आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पहिल्या घटनेमध्ये गुरिंदर पाल सिंग (वय-६०, रा. वानवडी) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार व्हाटसअप ग्रुप वरील विविध नंबर, विविध बँक धारका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २४ नोव्हेंबर २०२३ ते २८ फेब्रुवारी २०२४ या दरम्यानचा काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांना सायबर चोरट्याने एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये ऍड केले. त्यामध्ये दररोज शेअर मार्केटविषयी माहिती दिली जात होती. गुंतवणूक केल्यास चांगले परतावा मिळतो असे भासवले जात होते. गुंवणूकीचे आमिष दाखवून त्यांना ट्रेडिंग करण्यासाठी एक ऍप डाऊनलोड करायला लावले. यात फिर्यादी यांनी गुंतवणूक केली. यानंतर त्यांच्या ऍपवर शेअर ट्रेडिंग मधून फायदा झाल्याचे दिसून येत होते. मात्र तिवारी यांना ते पैसे काढता येत नव्हते. यावेळी त्यांनी सायबर चोरट्याशी संपर्क केला तेव्हा वेळोवेळी आणखी पैसे भरण्यासाठी तगादा लावला जात होता. पैसे मिळणार नाही याची खात्री झाल्यावर तिवारी यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुसऱ्या प्रकरणामध्ये, मंगेश अरविंद भगुरकार (वय- ५०, रा. वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेअर ट्रेडिंगमध्ये चांगला नफा देण्याचे आमिष दाखवून त्यांना ४ लाख ४५ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र कोणताही नफा न देता त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.