बेल्हा : जुन्नर तालुक्यातील बेल्हा येथे मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील दोन जणांनी चक्क बंद टॉवरवर चढुन अनोखे आंदोलन केले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळपासुनच गावात सर्वत्र शांतता होती. गावातील लोकांनी उस्फुर्तपणे दुकाने, व्यवहार बंद ठेवत या आंदोलनाला पाठिंबा दिला. याच दरम्यान कैलास औटी व शरद औटी या दोघांनीही २६० फुट ऊंचीवर बंद असलेल्या टॉवरवर चढुन अनोखे आंदोलन केले. त्यानंतर या टॉवर खाली गावातील व परिसरातील अनेक जण व पोलीस आले.पोलीस प्रशासनाने याठिकाणी तत्काळ रुग्णवाहिकेची व्यवस्था केली होती.या ठिकाणी २०१३ साली बांधलेला हा टॉवर बंद अवस्थेत आहे. जवळजवळ तीन तास हे आंदोलन केले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ जमा झाले होते. निवेदन देण्यासाठी अधिकारी आल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्र या आंदोलकांनी घेतला होता. आंदोलकांना बंद टॉवरवरुन खाली उतरण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. त्यानंतर आंदोलक या टॉवरवरुन खाली उतरले.
मराठा आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ते चढले थेट ‘टॉवर’वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 3:05 PM
गावातील लोकांनी उत्स्फूर्तपणे दुकाने, व्यवहार बंद ठेवत या मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला. याच दरम्यान कैलास औटी व शरद औटी या दोघांनीही २६० फुट ऊंचीवरच्या टॉवरवर चढुन अनोखे आंदोलन केले.
ठळक मुद्देनिवेदन देण्यासाठी अधिकारी आल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्र या आंदोलकांनी घेतला आंदोलकांवरती कोणतेही गुन्हे दाखल करु नये असे ग्रामस्थ व आंदोलकांची पोलिसांना विनंती