शेलपिंपळगाव (जि. पुणे) : ‘‘विठ्ठल, माऊली आणि तुकोबांच्या दर्शनाला जायचं असेल तर कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. त्यामुळे कोणी सांगितलं, की तुम्हाला परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजलेला नाही. विशेषत: सच्चा वारकरी अशी भूमिका कधीही घेणार नाही आणि त्याकडे मी फारसे लक्ष देत नाही,’’ असा खोचक टोला माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाव न घेता राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला.
स्वानंद सुखनिवासी सद्गुरू विष्णुबुवा जोगमहाराज जन्मशताब्दी सोहळ्यास सदिच्छा भेट देण्यासाठी शनिवारी पवार आळंदीत आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, रामायणाचार्य रामरावजीमहाराज ढोक आदी उपस्थित होते. पवार म्हणाले, की समाजाने मला खूप काही दिले आहे. आजपर्यंत चौदा वेळा निवडून दिले असून चार वेळा मुख्यमंत्री केले. त्यामुळे ५२ वर्षे अखंड समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे.
शरद पवार यांच्या हत्येच्या कटाच्या संशयाची तक्रारपुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याच्या संशयाची तक्रार लक्ष्मीकांत खाबिया यांनी पुणे सायबर पोलीस ठाण्यात केली आहे़ तक्रार अर्जात खाबिया यांनी नमूद केले की, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर काही लोकांकडून एका यू ट्युब चॅनेलवर दिलेल्या भाषणावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत़ त्यात शरद पवार यांना संपविले पाहिजे, बॉम्ब व गोळ््यांचा वापर केला पाहिजे़ तसेच पवार यांची बदनामी करणाऱ्या अनेक प्रतिक्रिया आहेत़ पोस्टमन या यू ट्यूब चॅनेलवर कमेंट करणाऱ्यांविरोधात खाबिया यांनी ही तक्रार दाखल केली आहे.माउलींच्या समाधीचे घेतले दर्शनआपणाला जो रस्ता पसंत आहे; त्या रस्त्यावर प्रामाणिकपणाने जायचं असतं. तिथे बांधिलकी ठेवायची असते. त्यांच्यामध्ये तडजोड करायची नसते. याच भावनेने आळंदीत येऊन माऊलींचे दर्शन घेतले. तसेच जोगमहाराज जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी झालो. मी स्वत:ला धन्य मानतो.- शरद पवार, माजी केंद्रीय कृषिमंत्री.