पुणे: अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार केल्या प्रकरणात दोन आरोपी हे रेल्वे कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाल्यावर पुणे रेल्वे प्रशासनाने त्या दोघाना निलंबित केले आहे. यात प्रशांत सॅमियल गायकवाड (टीएलअँडएसी, विद्युत विभाग, पुणे स्थानक) व राजकुमार रामनगिना प्रसाद (इलेक्ट्रिक व देखभाल, विद्युत विभाग, पुणे स्थानक) या दोघांना रेल्वे प्रशासनाने सोमवारी तडकाफडकी निलंबित केले. या दोघांनी त्या मुलीला पुणे स्थानकाच्या इलेक्ट्रिक लोको मेन्टनन्स शेड येथील विद्युत विभागाच्या कार्यालयात घेऊन गेले आणि तिथेच पहिल्यांदा तिच्यावर अत्याचार केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यामुळे पुणे स्थानकांवर वाढती गुन्हेगारी अधोरेखित होत आहे. रेल्वे प्रवासी असो व रेल्वे महिला कर्मचारी सारेच पुणे स्थानकावर असुरक्षित असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. मागच्याच महिन्यात पुणे स्थानकांवरील फलाट १ वर एका महिला रेल्वे कर्मचाऱ्यावर अतिप्रसंग ओढवला होता. ही घटना ताजी असतानाच आता अल्पवयीन मुलीची अत्याचाराची घटना घडली.
ते दोन रेल्वे कर्मचारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2021 4:15 AM