शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
2
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: मित्रांकडून लाभ होईल, मंगल कार्याची सुरूवात करू शकता!
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मनसेमुळे आघाडीला ८ जागी बसला फटका; शिंदेसेनेमुळे मनसेचे ३ प्रमुख उमेदवार पराभूत
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: मुंबईत भाजपच नंबर वन, ३६ पैकी १६ जागांवर दणदणीत विजय; उद्धवसेनेपुढे मोठं आव्हान
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: विधानसभेत महिलांचा आवाज बुलंद केव्हा होणार?; महामुंबईत फक्त ८ महिला आमदार
7
मंत्रिपदांसाठी अनेक नावांची चर्चा; महामुंबई परिसरातून इच्छुकांमध्ये जबरदस्त रस्सीखेच
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उद्धवनी मुंबई राखली, मात्र काँग्रेसचा पीळ सुटत नाही; नेत्यांची खदखद बाहेर पडली
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: पालघरमधील ‘ठाकूर’शाही संपुष्टात आली?; कथित पैसे वाटपाच्या गोंधळाने नुकसानच झालं
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अल्पसंख्याक बहुल मतदारसंघात काय घडले?; १३ पैकी ६ आमदार निवडून आले
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ठाणे जिल्ह्यात भाजपा शिवसेनेवर भारी; महापालिकेच्या अतिरिक्त जागा भाजप मागेल का?
12
तुमच्या वाहनासाठी आवडीचा क्रमांक घरबसल्या मिळवा; आरटीओची आजपासून ऑनलाइन सुविधा
13
..त्या काळाची फार आठवण येते; ही निवडणूक आणि राजकारणाचा ‘तो’ जमाना
14
हेमंत सोरेन २८ ला घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ; पत्नी कल्पना यांनाही बनविणार मंत्री
15
आज यशवंतरावांनी शरद पवारांना काय सल्ला दिला असता?
16
दोन ध्रुव अन् दोन आघाड्या..! प्रादेशिक अस्मिता जपणारे राजकारण सोपे राहिले नाही
17
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
18
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
19
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
20
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?

पाणी शोधायला गेले अन् जीव गमावून बसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2016 2:08 AM

तालुक्यातील सुरवड ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोलीकरण करतेवेळी स्फोट घडवल्यानंतर, शिल्लक राहिलेल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तिघे जण गंभीर

इंदापूर : तालुक्यातील सुरवड ग्रामपंचायतीच्या विहिरीचे खोलीकरण करतेवेळी स्फोट घडवल्यानंतर, शिल्लक राहिलेल्या स्फोटकांचा स्फोट झाल्याने दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला. तिघे जण गंभीर जखमी झाले. आज (दि. १३) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पाणी शोधायला गेले आणि जीव गमालेल्या ‘त्या’ कामगारांविषयी हळहळ व्यक्त होत आहे.कांतिलाल नरहरी शिंदे (वय ३५, रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर), कृष्णा महादेव भोसले (वय ५० वर्षे, रा. भांडगाव, ता. इंदापूर) अशी मरण पावलेल्या कामगारांची नावे आहेत. महादेव मच्छिंद्र कटाळे (वय ४० वर्षे), मारुती रामकृष्ण चौगुले (वय ४५ वर्षे), नितीन वामन शिंदे (वय ३३ वर्षे, सर्व रा. शेटफळ हवेली, ता. इंदापूर) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी अकलूज (ता. माळशिरस, जि. सोलापूर) येथे पाठवण्यात आले आहे.प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, सुरवड ग्रामपंचायतीच्या ताब्यातील विहिरीचे पाणी आटत आले होते. त्यामुळे शनिवारपासून त्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू होते. शेटफळ हवेली येथील हरिभाऊ शिंदे यांची यारी त्यासाठी वापरात आणण्यात येत होती. सोमवारी विहिरीचे खोलीकरण करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. परंतु स्फोटके उडविण्याची जबाबदारी कोणीही कामगार घेत नव्हता. ती जबाबदारी ग्रामपंचायतीने घेतली. त्यानुसार मंगळवारी विहिरीत स्फोटके उडवण्यात आली. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास काम करण्यासाठी कामगार विहिरीत उतरले. त्यानंतर काही वेळातच विहिरीत शिल्लक राहिलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला व ही दुर्घटना घडली. (वार्ताहर)उशिरापर्यंत गुन्हा नाहीया संदर्भात वृत्त लिहीपर्यंत पोलिसांकडे कसलीही नोंद झाली नव्हती. जखमींवर अकलूज येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी कुणी खबर अगर फिर्याद दिली तर पोलीस ठाण्यात तशी नोंद होईल, असे सहायक पोलीस निरीक्षक विलास नाळे यांनी सांगितले. या प्रकरणाची व स्फोटके उडवण्यासाठी ग्रामपंचायतीने रीतसर परवानगी घेतली होती का, याची चौकशी करण्यात यावी. मयतांच्या कुटुंबीयांना व जखमींना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.- संजय कांबळे, तालुका संघटक, भारतमुक्ती मोर्चा