"तुझाच मर्डर करणार होते...", काँग्रेस शहराध्यक्षाची भाजप शहराध्यक्षावर वादग्रस्त टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 02:43 PM2024-07-03T14:43:04+5:302024-07-03T14:46:47+5:30
दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धीरज घाटे यांनी शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्स वरील राहुल गांधींच्या प्रतिमेवर फुली मारण्यात आली आहे...
- किरण शिंदे
पुणे : संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधी पक्ष नते राहुल गांधी (rahul Gandhi( यांनी हिंदू धर्मावर केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्यावरून राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. भाजपचे पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे (Dhiraj Ghate) यांनी पोस्टर लावून राहुल गांधींचा निषेध केला आहे. यावर आता काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे (Arvind shinde) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो. त्याचाच मर्डर करणार होते असे म्हणत अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
अरविंद शिंदे म्हणाले, "पुणे शहर भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो. त्याचाच मर्डर करणार होते. त्याचे वागणे काय आहे त्यालाच विचारा. तू कधीही एकटा फिरू शकत नाहीस, तू कधीही मरशील, कारण तुझी कर्म तशी आहेत. तुमची लोक पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतात. कारण तुमची कर्मच तशी आहेत. जसे कर्म कराल तसे तुम्हाला भोगावे लागते." असे म्हणत अरविंद शिंदे यांनी जोरदार टीका केली आहे.
मोदींचा चेहरा पाहण्यासारखा होता...
अरविंद शिंदे पुढे म्हणाले, हिंदूंच्या नावाने तुम्ही ज्या प्रकारे हिंसा करता ते हिंदूंना अपेक्षित नाही असे राहुल गांधींना सांगायचे होते. परंतु भारतीय जनता पक्षाकडे कोणताही मुद्दा नसल्याने ते आता शब्दांची फिरवाफिरवी करत आहे. मात्र जनता त्यांना भीक घालणार नाही. हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही तर तो इतर धर्माचा आदर करतो हेच राहुल गांधींना सांगायचे होते. हे सांगत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा पाहण्यासारखा होता.
'हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल'
दरम्यान राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी धीरज घाटे यांनी शहरात अनेक ठिकाणी फ्लेक्स लावले आहेत. या फ्लेक्स वरील राहुल गांधींच्या प्रतिमेवर फुली मारण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला स्वामी विवेकानंद यांच्या फोटोसह 'खबरदार, हिंदू धर्माला नावे ठेवाल तर समुद्रात फेकून देईल' असा मजकूर छापण्यात आला आहे. आणि याच पोस्टरवरून भाजप आणि काँग्रेस शहराध्यक्षात वाद पेटला आहे.
राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी शहरात असे फ्लेक्स लावले आहेत#RahulGandhi#BJPpic.twitter.com/1uMHQRc5kQ
— Lokmat (@lokmat) July 3, 2024