बारामती : मोटार सायकल चोरी करणाऱ्या आरोपीला बारामती तालुका पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. कृष्णा महादेव जाधव वय (२३ ),(रा.लालपुरी, ता. इंदापूर. जि पुणे ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ॉ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जाधव याच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाणे, बारामती शहर पोलीस ठाणे, सासवड पोलीस ठाण्यात मोटार सायकल चोरी केल्या बाबत गुन्हे दाखल होते. तसेच वालचंदनगर पोलीस ठाण्यात गाय चोरी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याची माहिती गुन्हेशोध पथकाचे प्रमुख योगेश लंगुटे यांनी दिली. गुरुवारी रोजी गुन्हेशोध पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी कृष्णा महादेव जाधव याला वालचंदनगर येथून ताब्यात घेण्यात आला. ताब्यात घेतल्या नंतर जाधव याची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्याच्याकडून एकुण पाच चोरीच्या मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनखाली बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण,बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे, पोलीस कॉनस्टेबल विजय वाघमोडे, राहुल पांढरे, नंदू जाधव , मंगेश कांबळे, विनोद लोखंडे यांनी केली आहे.
--
२६ बारामीत मोटारसाकलचोर
फोटो ओळी : मोटार सायकल चोराला अटक करताना महेश ढवाण, योगेश लंगुटे व पथक
Attachments area