पियुष गणेश भरम, वय १९ वर्षे, राहणार आंबेगाव पठार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार २४ फेब्रुवारी रोजी एक ज्येष्ठ महिला राजस सोसायटीजवळील बस थांब्यापासून पायी जात असताना मोपेडवरुन आलेल्या आरोपीने तीची पर्स हिवकावली होती. सदर गुन्हयाचा तपास सुरु असताना, पियुष फोन विक्री करण्यासाठी कात्रज ओव्हरब्रीजखाली येणार असल्याची खबर अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांना मिळाली होती. त्यानूसार त्याला सापळा लावून पकडण्यात आले. यावेळी त्याच्या कडून गुन्हयात वापरलेली ऍक्टीव्हा गाडी जप्त करण्यात आली आहे. त्याने यापुर्वी एका साथीदाराच्या मदतीने मेडिकल शॉपच्या गल्लयातील २२ हजाराची रोकड चोरुन नेली होती. या गुन्हयात तो फरार होता.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, राहुल तांबे, गणेश शेंडे, विक्रम सावंत, सर्फराज देशमुख, संतोष भापकर, राहूल तांबे आदींच्या पथकाने केली.