पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी एक ज्येष्ठ महिला राजस सोसायटीजवळील बस थांब्यापासून पायी जात असताना मोपेडवरून आलेल्या आरोपीने तिची पर्स हिसकावली होती. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना, पीयूष फोन विक्री करण्यासाठी कात्रज ओव्हरब्रीजखाली येणार असल्याची खबर अभिजीत जाधव व विक्रम सावंत यांना मिळाली होती. त्यानुसार त्याला सापळा लावून पकडण्यात आले. यावेळी त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त करण्यात आली आहे. त्याने यापूर्वी एका साथीदाराच्या मदतीने मेडिकल शॉपच्या गल्ल्यातील २२ हजारांची रोकड चोरून नेली होती. या गुन्ह्यात तो फरार होता.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, उपनिरीक्षक नितीन शिंदे, राहुल तांबे, गणेश शेंडे, विक्रम सावंत, सर्फराज देशमुख, संतोष भापकर, राहुल तांबे आदींच्या पथकाने केली.