पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली होती. शेवाळवाडी येथील कळंबादेवी मंदिर चोरीतील संशयित लालू बजरंग दुधवडे हा त्याच्या इतर दोन साथीदारांसह जाधववाडी परिसरात फिरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जाधववाडी येथे तीन जण संशयित फिरत असल्याचे पाहिले. पोलिसांची चाहूल लागताच त्या तिघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने त्यांना शिताफीने पाठलाग करून पकडले. त्यांची नावे विचारली असता त्यांनी लालू बजरंग दुधवडे (वय २८, रा. वनकुटे, ता. संगमनेर), भरत बजरंग दुधवडे (वय ३० रा. वनकुटे, ता. संगमनेर), अनिल देऊभाऊ काळे (वय २१ रा. भोजदरी, ता. संगमनेर) अशी सांगितली. अधिक चौकशीत त्यांनी मंचर शेवाळवाडी येथील मंदिरात चोरी केल्याचे कबूल केले. तसेच त्यांनी तिघांनी मिळून एक मोटारसायकल तसेच शेतकऱ्यांच्या पाणी मोटारी, केबल व इतर साहित्य चोरल्याचे सांगितले.
फोटोखाली : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चोरट्यांना जेरबंद केले.