लोकमत न्यूज नेटवर्कभोर : शहरात व तालुक्यात आठवडाभरापासून पाले येथील विहिरीवरील मोटर, आंबाडे जानुबाई मंदिर येथून दुचाकी आणि रामबाग येथील पेट्रोलपंपावरून डंपर असा एकूण ९ लाख ३६ हजार रु. चोरी झाली आहे. मंगळवारच्या बाजारात व एसटी स्टँडवर वारंवार मंगळसूत्रचोरीचे व पाकीटमारीचे प्रकार घडत आहेत. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागत नाहीत.गेल्या आठवड्यात वीसगाव खोऱ्यातील पाले येथील सोपान तुकाराम पालेकर यांच्या विहिरीवरील सुमारे १८ हजारांची मोटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. उत्रौली येथील दिनेश कृष्णा शिवतरे हे लग्नानिमित्त आंबाडे गावातील जानुबाई मंदिरात गेले असताना त्यांची दुचाकी (एमएच १२ एचडी ३५४९) तेथून चोरीला गेली. २४ मे रोजी रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी रामबाग येथील पेट्रोल पंपावरून सुमारे ९ लाख रु. किमतीचा डंपर डुप्लीकेट चावीचा वापर करुन चोरीला गेला. फिर्याद दिनेश शेटे यांनी दिली आहे. दर मंगळवारी भोर शहरातील एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन काही महिला चोरट्या मंगळसूत्र पाकीटमारीचे प्रकार वारंवार घडत आहेत. मात्र भोर पोलिसांकडून अद्याप एकाही चोरीचा उलगडा झाला नाही. कुलूप असेल तर हमखास घरात चोरी होत असल्याच्या घटना घडत आहेत.
भोर शहरात चोरांची टोळी सक्रिय
By admin | Published: May 29, 2017 2:11 AM