(डमी १०६५)
विवेक भुसे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस हे गुन्हे उघडकीस आणण्याचा आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक आहे. त्याचवेळी चैनचोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांहून अधिक आहे. असे असले तरी या गुन्ह्यांमधून गेलेला माल गुन्हेगारांकडून परत मिळविण्याचे प्रमाण कमी आहे. २०१७ पासूनचे रिकव्हरीचे प्रमाण पाहिल्यास घरफोडीतील २५ टक्के, चैनचोरीतील ४० टक्के, वाहनचोरीचे ३६ टक्के, इतर चोरीच्या गुन्ह्यातील ३० टक्के माल हस्तगत करण्यात पोलिसांनी यश आले आहे.
मालमत्तेच्या चोरीच्या गुन्ह्यात चोरटे हे अनेकाना पैशांसाठी या चो-या करीत असतात. चोरीनंतर त्यातील बहुतांशी माल ते वेगवेगळ्या कारणासाठी उघडवितात. खाणे पिण्यामध्ये त्यातील बराचसा पैसा ते उडवत असतात. त्यामुळे तो हस्तगत करणे अशक्य असते. घरफोडी, चैनचोरीतील दागिन्यांची अल्प किमतीत ते विक्री करतात. ज्यांना हा माल विकला असतो. त्या सराफांकडून पोलीस दागिने जप्त करतात. मात्र, त्यालाही मर्यादा असतात. इतर चोरीच्या गुन्ह्यामध्ये ही चोरटे हा चोरीचा माल परस्पर अल्पकिमतीला विकत असतात. असा माल खरेदी करणा-यांकडून तो जप्त करणे अवघड जाते. चोरीला गेल्या वस्तूंपैकी उपयोगी नसलेल्या वस्तू चोरटे टाकून देतात, त्या पुन्हा हस्तगत करणे अवघड असते. अनेकदा चोरटे काही महिन्यांनी किंवा वर्षांनी सुद्धा मिळतात. तोपर्यंत चोरट्यांनी चोरीच्या वस्तूंची विल्हेवाट लावलेली असते. त्यामुळेच चोरटे मिळाले तरी त्यांच्याकडून चोरीला गेलेला माल पूर्णपणे हस्तगत करणे शक्य होत नसल्याचे वरिष्ठ पोलीस अधिका-यांनी सांगितले.
२०१७ ते जुलै २०२१ एकूण पर्यंतचे मालमत्तेच्या गुन्हे दाखल व उघड
गुन्ह्यांचा प्रकार दाखल गुन्हे उघडकीस आलेले गुन्हे टक्केवारी
घरफोडी २३३५ ११८८ ५०टक्के
चैनचोरी ३२८ २३८ ७२ टक्के
वाहनचोरी ७४६० २२७२ ३० टक्के
इतर चोरी ५४१५ २०१९ ३७ टक्के
..................
२०१७ ते जुलै २०२१ एकूण मालमत्तेच्या गुन्ह्यात गेला माल मिळाला माल
गुन्ह्याचा प्रकार गेला माल मिळाला माल टक्केवारी
घरफोडी ४११६११०१४ १०३५०८५४२ २५ टक्के
चैनचोरी २३९१३६६० ९६४०८६९ ४० टक्के
वाहनचोरी ४२४२३७१३१ १५५४३०८६३ ३६ टक्के
इतर चोरी ५६६१८८८०९ १७११३६४१२ ३० टक्के
.............