पुणे : चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडून लोखंडी पाईपच्या साह्याने चोरी करणाºया सराईतास अखेर अटक केली. युनिट चारच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळत लँपटॉप, मोबाईल, दागिने असा ऐवज त्याच्याकडून जप्त केला आहे. चंद्रकांत बापू साळवे (वय २९, रा. चंदननगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. चंदननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही दिवसांत रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडून लोखंडी पाईपच्या साहाय्याने मोबाईल, लॅपटॉप, सोने व इतर किंमती ऐवजाची चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी दोन तक्रारी दाखल झाल्या होत्या. पहिल्या तक्रारीत वॉचमनचे काम करणा-याच्या मुलीचा लॅपटॉप चोरीला गेला होता. त्याने मुलीच्या शिक्षणासाठी लॅपटॉप हफ्त्याने खरेदी केला होता. लॅपटॉपचे दोनच हप्ते भरलेले असताना तो चोरीला गेला. यामुळे त्यांच्या मुलीच्या शिक्षणात मोठा व्यत्यय आला होता. तर दुसरा तक्रारदार हा आयटी कंपनीत डेटा बेस अ?ॅडमीन म्हणून काम करत आहे. त्याने लॅपटॉवर रात्रभर जागून अतिमहत्वाचा प्रोजेक्ट पुर्ण केला होता. त्याला तो दुसºया दिवशी कंपनीत सादर करायचा होता. मात्र त्याचा लॅपटॉप, मोबाईल आणि सोने चोरण्यात आले. चंदननगर पोलीस ठाण्यात दोन्ही तक्रारी दाखल झाल्यावर गुन्हे शाखेचे युनिट चारचे पथक समांतर तपास करत होते. तपास करताना पोलीस कर्मचारी अब्दुलकरीम सय्यद व सचिन ढवळे यांना सराईत गुन्हेगार चंद्रकांत साळवे अशा प्रकारच्या चो-या करत असल्याची माहिती मिळाली. तो चंदननगर येथे पाण्याच्या टाकीजवळ लॅपटॉप विकायला येणार असल्याची खबर मिळताच सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीचा माल हस्तगत केला. तसेच आणखी एक सॅमसंग कंपनीचा मोबाईलही हस्तगत केला गेला. त्याच्यावर यापूर्वी विमाननगर, येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलीस उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय झंजाड, पोलीस कर्मचारी अब्दुलकरीम सय्यद, सचिन ढवळे, शंकर पाटील, गणेश साळुंके, राजू मचे, भालचंद्र बोरकर, हनुमंत बोराटे, रमेश सावळे, अतुल मेंगे यांच्या पथकाने केली.
खिडकीतून शिरुन चोऱ्या करणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 1:38 PM
मागील काही दिवसांत रात्रीच्या वेळी घराची खिडकी उघडून लोखंडी पाईपच्या साहाय्याने मोबाईल, लॅपटॉप, सोने व इतर किंमती ऐवजाची चोरीच्या घटना वाढल्या होत्या.
ठळक मुद्देदीड लाखांचा ऐवज केला जप्त : युनिट चारच्या पथकाकडून कारवाई