शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
3
मुख्यमंत्रि‍पदाच्या स्पर्धेतून एकनाथ शिंदेंची माघार?; भाजप हायकमांडच्या भूमिकेनंतर चर्चांना उधाण
4
'एक'नाथ हैं तो सेफ है' घोषणेवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले...
5
युद्ध थांबले! इस्रायल आणि हिजबुल्लामध्ये युद्धविराम, दोन्ही देशात करार झाला; वाचा सविस्तर
6
६५ टक्के आमदारांवर गंभीर गुन्हे, २७७ करोडपती; जाणून घ्या, शिक्षित आमदार किती?
7
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
8
SIP Vs PPF Vs ELSS: ₹१.५ लाखांच्या गुंतवणुकीवर पहिलं कोण बनवेल कोट्यधीश; पाहा गणित, मिळतील ₹८.११ कोटी
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
10
मतदान करत नाही, मग 'हे' वाचाच; स्वतंत्र वाहन, रात्रभर २५० किमी प्रवास अन् पोहोचलं एक मत..
11
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
12
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
13
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
14
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
15
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
16
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
17
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
18
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
19
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
20
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!

मांजरेवाडीत चोरट्यांचा कृषी पंपावर डल्ला, रात्रीत ८ पंप लांबविले; शेतकऱ्यांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 2:16 PM

चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे....

राजगुरुनगर (पुणे) : मांजरेवाडी पिंपळ (ता. खेड ) येथील शेतकऱ्यांचे भीमा नदीकाठावरील ( दि ३१ ) पहाटे रात्रीच्या सुमारास शेतकऱ्यांचे तब्बल ८ कृषी पंप चोरुन नेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे लाखो हजाराचे नुकसान झाले. गेल्या काही महिन्यापासून राजगुरुनगर शहरात व ग्रामिण भागात चोरी, घरफोडी, दुचाकी, शेतकऱ्यांचे कृषी पंप, चोरी जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेदिवस वाढ झाली आहे. चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना अपयश येत असल्याचे चित्र दिसत आहे.

खेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत कृषी पंप व केबल चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे कृषी पंप व इतर साहित्य चोरिला जात असून शेतकरी हतबल झाला आहे. मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी या परिसरात भीमा नदीकाठी चोरट्यांनी धुमाकुळ घालत रात्रीच्या सुमारास नदीवर कृषी सिंचनासाठी बसविले विद्युत पंप चोरुन नेले. चोरट्यांनी विद्यूत पंपाचे पाईप कापून, केबल तोडून नासधुस केली. आधीच पुरेसा पाऊस नाही. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना अहोरात्र राबावे लागते. त्यातच विद्युत पंपांच्या चोरीने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

खेड पोलिसांत शेतकऱ्यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार दिली असून कृषीपंपाचे संरक्षण कसे करायचे, असा शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वी मांजरेवाडी परिसरात कृषी पंप चोरिला गेले आहेत. या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी चोरट्यांचा शोध घ्यावा अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य अशोक मांजरे, प्रविण मांजरे, माजी उपसरपंच सतीश मलघे, राहूल मलघे, सागर लालासाहेब मांजरे, बाबाजी मांजरे यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

मांजरेवाडी पिंपळ परिसरात गेल्या तीन वर्षापासून मोटार चोरीचे सत्र सुरू आहे याचा तपास अजुन लागला नसून चोरट्यांचे फावले आहे कधी वीज भारनियमन तर कधी नदीत पाणीच नाही, त्यात विद्युत मोटारी चोरी होत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

- मनोहर मांजरे. ( शेतकरी, मांजरेवाडी पिंपळ ता खेड)

नदीकाठ परिसरात रात्रीच्या वेळी कोणी नसल्याने विद्युत पंपावर चोरटे डल्ले मारत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होतेच तसेच वेळेवर पिकांना पाणी देता येत नसल्याने पिके ही हातून जात आहे. या परिसरात रात्रीची पोलिसांनी गस्त घालावी.

- सतीश मलघे (माजी उपसरपंच, मलघेवाडी ता. खेड )

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड