शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी पळविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 10:01 PM

दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना रानमळा (ता. खेड ) येथे घडली आहे.

राजगुरूनगर: चारचाकी गाडीच्या काचा फोडून गाडीतील सुमारे दोन लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना रानमळा (ता. खेड ) येथे दि. १६ रोजी दुपारी घडली आहे. याबाबत नितीन बाळासाहेब गायकवाड  (वय ४७ ) रा  कुरूळी  (ता, खेड ) यांनी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध खेडपोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गायकवाड यांनी दोन लाख रुपये बॅकेतुन काढून त्यांच्या गाडीत ठेवली होती. ते चारचाकी घेऊन रानमळा कडुस (ता खेड ) येथे गेले होते. चारचाकी पार्क करून प्लॉटवर गेले असता, दरम्यान अज्ञात चोरट्यांनी कोणी नसल्याचा गैरफायदा घेऊन गाडीच्या डाव्या बाजूच्या  मागील व पुढील काचा फोडून गाडीत ठेवलेल्या लॅपटॉप बॅगमधील रोख दोन लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबविले. तसेच चोरट्यांनी महत्वाची कागदपत्रे चोरून नेली. मात्र कागदपत्रे चोरट्यांनी घटनास्थळापासुन काही अंतरावर ती टाकून दिली. या घटनेचा पुढील तपास पोलिस हावलदार नवनाथ थिटे करित आहे.

 

टॅग्स :KhedखेडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसtheftचोरीThiefचोर