नीलेश जंगम, पिंपरीबेडसीट, चादरी, व्हीलचेअर अशा वस्तू यशवंतराव चव्हाण रुग्णालयातून (वायसीएम)चोरीला जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अगोदरच मनुष्यबळाचा अभाव, त्यात दिवाळी सुटीत रजेवर गेलेले कर्मचारी यामुळे आहे त्या कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत आहे. त्यांनी काम करायचे की चोरट्यांकडे लक्ष द्यायचे, असे स्थिती निर्माण झाली असून, या प्रकाराची झळ कर्मचाऱ्यांना बसू लागली आहे. खाटेवरील बेडसीटपासून ते व्हीलचेअरपर्यंत अनेक वस्तू वायसीएम रुग्णालयातून चोरीला जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एका रुग्णाने फ्रॅ क्चर पायाला लावलेले लोखंडी पट्ट्यांचे वजन (ट्रॅक्शन) घरी नेले. ड्युटी बदलत्या वेळी रुग्णाला वापरायला देण्यात आलेले ट्रॅक्शन आढळून आले नाही. रुग्ण अथवा त्याच्या नातेवाइकांनी चोरल्याचे निदर्शनास आले. महापालिका कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या सेवापुस्तिकेत अशा गोष्टींची नोंद करावी लागते. ती नोंद होणे टाळावे, कटाकटी होऊ नये, यासाठी त्यांच्याकडून अशा घटनांमध्ये संबंधित कर्मचाऱ्याला त्या वस्तूची भरपाई द्यावी लागत आहे. ऐन दिवाळीत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे अतिरिक्त कामाचा ताण घेणाऱ्या एका परिचारिकेला चोरीला गेलेले साहित्य स्वखर्चाने आणून जमा करण्याचा भुर्दंड सोसावा लागला. काही दिवसांपूर्वीच महापालिकेच्या मोठ्या पदाधिकाऱ्याने चक्क एक व्हिलचेअरच घरी नेल्याची घटना घडली होती. ही बाब कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी पदाधिकाऱ्याला संपर्क साधला. तुमच्या ओळखीचा रुग्ण रुग्णालयातून गेल्यापासून व्हीलचेअर नाही, असे सांगितले. कर्मचाऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्यावर त्या पदाधिकाऱ्याने व्हीलचेअर परत आणून दिली. परिचारिका, वॉर्डबॉय, मावशी यांनी रुग्णालयातील साहित्यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. परंतु, ते ठेवत नाही म्हणूून चोऱ्या होतात. वायसीएम रुग्णालयात मनुष्यबळ कमी असल्याने कामाच्या अतिरिक्त ताणामुळे प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देणे कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही. चोरीला गेलेल्या वस्तूचे पैसे पगारातून कमी केले जातात. सेवापुस्तकात दंड, गैरवर्तन यांसारख्या गोष्टींच्या सर्व नोंदी असतात. त्यामुळे सेवापुस्तकात नोंद होऊ नये, त्यातून काही तोडगा निघावा, यासाठी कर्मचारी प्रयत्न करीत असतात. ते स्वखर्चाने वस्तू आणून देतात. यामुळे वायसीएममध्ये काम करणाऱ्या परिचारिका, इनचार्ज, डॉक्टर्स यांना काही ना काही झळ पोहचत आहे. चोरील्या गेलेल्या वस्तू परत आणण्यासाठी किंवा त्या बदल्यात दुसऱ्या वस्तू ठेवण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या पातळीवर प्रयत्न केले जातात. वरिष्ठांना कोणत्याही गोष्टी कळण्याअगोदरच गहाळ झालेल्या वस्तू आहे त्या ठिकाणी पूर्ववत ठेवल्या जातात. याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याशी विचारणा केली असता यातील कोणतीही गोष्ट माझ्यापर्यंत आली नसल्याचे त्यांनी सांगितले. चोरी होत असल्याप्रकरणी कोणतीही तक्रार नाही. त्यामुळे उपाययोजना करणे अथवा त्यावर तोडगा काढण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.कमकुवत सुरक्षा यंत्रणावायसीएम रुग्णालयात मुख्य प्रवेशद्वारावर कडक सुरक्षा यंत्रणा तैणात केली आहे. रुग्णाच्या कोणत्याही नातेवाइकाला ओळखपत्राशिवाय आत सोडले जात नाही. कामाशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस आत जाण्यास मनाई केली आहे. मात्र, रुग्णालयातून बाहेर जाताना लहान बालक घेऊन जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस थांबविले जाते. चौकशी करूनच सोडले जाते. त्यांच्याजवळ असणाऱ्या पिशव्या तपासल्या जात नाहीत.
‘वायसीएम’मध्ये चोरांची दिवाळी
By admin | Published: November 15, 2015 1:01 AM