इंदापूर : शहरातील व्यंकटेशनगर भागातील घरासमोरच्या मोकळ्या जागेत बांधलेल्या एक लाख रुपयांच्या दोन गाभण जाफराबादी म्हशी चोरून नेल्याच्या कारणावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.शाम हिरा सूर्यवंशी ( रा.व्यंकटेशनगर, इंदापूर) यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली आहे. एका खाजगी दवाखान्यात वॉर्डबॉय म्हणून काम करणारे सूर्यवंशी जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करत आहेत. त्यासाठी त्यांनी जाफराबादी जातीच्या दोन म्हशी पाळल्या आहेत. त्या म्हशींना ते घरासमोरच्या मोकळ्या जागेत बांधतात.१५ जानेवारी रोजी रात्री दोन्ही म्हशींचे चारा पाणी केल्यानंतर दहा वाजता सूर्यवंशी दाम्पत्य झोपी गेले. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या सुमारास उठून साफसफाई करण्यासाठी गेल्यानंतर दोन्ही म्हशी जागेवर नसल्याचे सूर्यवंशी यांना लक्षात आले. शोधाशोध करुन ही त्या सापडल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
चोरांची “नजर’ आता पशुधनावर; ‘म्हशी’ चोरल्या, एक लाखांचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 17:32 IST