शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
5
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
7
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
8
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
9
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
10
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
11
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
12
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
13
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
14
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
16
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
17
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
18
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
20
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले

Pune | खेड तालुक्यात चोरट्यांचा कृषी पंपावर डल्ला; रात्रीत पाईप कापून लांबविले पाच पंप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 7:25 PM

चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना अपयश...

राजगुरुनगर (पुणे) : कोहिनकरवाडी (ता. खेड) येथील शेतकऱ्यांचे चासकमान धरणाच्या कालव्यावरील चार कृषी पंप चोरीला गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे सुमारे ५० हजाराचे नुकसान झाले. गेल्या काही महिन्यांपासून राजगुरुनगर शहरात व ग्रामीण भागात चोरी, घरफोडी, दुचाकी, शेतकऱ्यांचे कृषी पंप, चोरी जाण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. चोरट्यांना पकडण्यात मात्र पोलिसांना यश येत नसल्याचे चित्र दिसत आहे.

तालुक्यात कृषी पंप व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे कृषी पंप व इतर साहित्य चोरीला जात असून शेतकरी हतबल झाला आहे. कोहिनकरवाडी - मुळेवस्ती येथील  शेतकरी रामदास बबन कोहीनकर ( रा. कोहीनकरवाडी ता. खेड ) यांनी शेतजमिनीला पाणी देण्यासाठी चासकमान धरणाच्या डाव्या कालव्यावर कृषी पंप बसविला होता. (दि. ८) रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेला. कोहिनकर या शेतकऱ्यांचे दहा हजारांचे नुकसान झाले.

तसेच याच परिसरातील कॅनॉलवर बसविलेल्या संतोष विठ्ठल कोहीनकर, बाळासाहेब बबन कोहीनकर, फक्कड बबन कोहीनकर, सुदाम रामभाउ कोहीनकर या शेतकऱ्यांचेही मोटार चोरट्यांनी चोरून नेल्या. या शेतकऱ्यांचे सुमारे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच मांजरेवाडी येथील शेतकरी किसन रामभाऊ मांजरे या शेतकऱ्यांने भीमानदीकाठी असलेला कृषी पंप पाईप कापून चोरट्यांनी  चोरून नेला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीPuneपुणेtheftचोरी