पुणे : माैजमजेसाठी तसेच पैसे कमविण्यासाठी पुण्यातील विविध भागातून दुचाकी चाेरणाऱ्या दाेघांना फरासखाना पाेलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून महागड्या 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची किंमत 14 लाख रुपये इतकी आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संताेष विष्णु नागरे (वय 25, रा. भेकराईनगर हडपसर), सागर शरद समगीर (वय 28, रा. पुरंदर) यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. संताेष आणि सागर यांनी पुण्यातील फरासखाना, विमानतळ, हडपसर, काेंढवा, विश्रांतवाडी, सासवड या भागामधून महागड्या 20 दुचाकी चाेरल्या. नाेव्हेंबर 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत या गाड्या चाेरल्या. त्यांनी या गाड्या चाेरुन भाेर येथील एका बंद गाेठ्यामध्ये ठेवल्या हाेत्या. आराेपी या गाड्यांची विक्री करण्यासाठी पुण्यातील नाना पेठ येणार असल्याची माहिती पाेलीस कर्मचारी शंकर कुंभार यांना मिळाली. पाेलिसांनी दुधभट्टी गणेश पेठ येथे सापळा रचून आराेपींना अटक केली. त्यांच्याकडे चाैकशी केल्यानंतर त्यांच्याकडून पुण्यातील विविध भागातून चाेरी करण्यात आलेल्या 20 दुचाकी जप्त करण्यात आल्या. आराेपींनी आणखी वाहने चाेरली आहेत का याबाबत पाेलीस तपास करत आहेत.
अधिक तपास फरासखाना पाेलीस करत आहेत.