दावडी (पुणे): खेड तालुक्यात येथे चोरट्यांनी दोन मंदिरे फोडून मंदिरातील ५ घंटे, ४ समई, ताब्यांची भांडी असा एक लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना (दि २८ ) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. दिवसेंदिवस दावडी येथे होणाऱ्या वाढत्या चोरीच्या घटनांना पोलिसांनी आळा घालवा अशी मागणी माजी सरपंच आबा घारे यांनी केली आहे.
दावडी परिसरातील आरूडमळा येथे डोंगरावर खंडोबा देवाचे मंदिर आहे. या मंदिरात रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करून या मंदिरातील ३ घंटे, दोन मोठ्या समई, दोन कर्ण असे साहित्य चोरून त्यानंतर चोरट्यांनी डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शंकर मंदिरात मोर्चा वळवून मंदिरारातील २ घंटे, ताब्यांची भाडी, दोन छोट्या समई, सांऊड बॉक्स असा एक लाख रुपायांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला.
सकाळी भाविक मंदिरात दर्शनासाठी गेल्यावर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. खेड पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा आहे. मागील महिन्यात ही चोरट्यांनी या परिसरातुन कृषी पंप लांबविले होते. यांचा उदयाप शोध पोलिसांना लागला नाही. दिवसेंदिवस कृषी पंप, केबल, मंदिरातील चोऱ्या वाढल्या असल्याचे चित्र दिसत आहे.