शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

तृतीयपंथीयांना मिळणार प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 3:17 AM

गैरप्रकार रोखण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम; खरे-खोटे तृतीयपंथीय ओळखणे होणार सोपे

पुणे : तृतीयपंथी असल्याचे भासवत गैरप्रकार करणाऱ्यांना लगाम लावण्यासाठी बुधवार पेठमध्ये वास्तव्यास असलेल्या तृतीयपंथीयांना ते तृतीयपंथीय असल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने हा उपक्रम हाती घेतला असून पुढील महिन्यांपासून त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठमध्ये मोठ्या प्रमाणात तृतीयपंथीय राहत आहेत. त्याठिकाणी राहणाºया काही व्यक्ती या मुद्दाम आपण तृतीयपंथी असल्याचे भासवून नागरिकांना लुटत आहेत. रात्रीच्या वेळी असे प्रकार सर्रास सुरू असतात. त्यामुळे या प्रकारांना लगाम लागावा आणि खरे तृतीयपंथीय ओळखता यावे, यासाठी त्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहेत, अशी माहिती प्राधिकरणाचे सचिव चेतन भागवत यांनी गुरुवारी दिली. याबाबत ससून रुग्णालय प्रशासनाशी पत्रव्यवहार करण्यात येणार आहे. प्रमाणपत्राची प्रक्रिया काय असेल, हे निश्चित झाल्यानंतर आशीर्वाद संस्थेच्या माध्यमातून टप्प्याटप्याने तृतीयपंथीयांना तपासणीसाठी ससूनला पाठविण्यात येईल. त्यानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यास सुरुवात होईल, असे भागवत यांनी सांगितले.गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही नागरिकांना आशीर्वाद देवून पोट भरत आहोत. आम्ही ती परंपरा तर बंद करू शकत नाही. प्रमापपत्र देण्याची योजना काय आहे, याची पूर्ण माहिती अद्याप आम्हाला देण्यात आलेली नाही. आतापर्यंत आम्हाला सरकारने काहीच मदत केली नाही, याची खंत आहे, असे आशीर्वाद संस्थेच्या प्रमुख पन्ना बारगेल यांनी सांगितले.शिबिरात वैद्यकीय तपासणीबुधवार पेठेत राहत असलेल्या तृतीयपंथीयांसाठी विधा सेवा प्राधिकरण आणि फरासखाना पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय तपासणी व कायदेशीर बाबींचे मार्गदर्शन शिबिर आयोजित केले होते.ससूनमधील डॉ. नितीन पनाड, डॉ. आनंद कपाडिया, डॉ. रिचा शर्मा, डॉ. हृषीकेश नाईक, डॉ. सतीश पोरे, डॉ. समीर तिरथाडे यांनी सुमारे ७० तृतीयपंथीयांची वैद्यकीयंं तपासणी केली. तर भागवत यांनी तृतीयपंथीयांबाबत प्रचलित कायदे आणि त्यांचे अधिकार याबाबत मार्गदर्शन केले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सहायक पोलीस निरीक्षक आरती खेतमाळीस, पोलीस नाईक सचिन कुटे आदी यावेळी उपस्थित होते.अनेक तृतीयपंथीयांना नोकरी करण्याची इच्छा आहे. प्रमाणपत्रामुळे त्यांना नोकरी मिळणे सोपे होईल. सुरुवातीला केवळ बुधवार पेठेमधील तृतीयपंथीयांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुढील काळात त्याची व्याप्ती वाढविण्यात येईल.- चेतन भागवत, सचिव, पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण

टॅग्स :Transgenderट्रान्सजेंडर