शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची..! संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील तिसरा रिंगण सोहळा देहूत साजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 4:06 PM

परंपरेनुसार सराटी येथील मुक्कामावरून संत तुकाराम महाराजांचा पायीवारी सोहळ्यातील तिसरे रिंगण अकलुजजवळ झाले असते.

देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३६ व्या पायीवारी पालखी सोहळ्यातील वाटचालीतील अश्वासह तिसरे गोल रिंगण सोहळा मुख्य मंदिराच्या आवारात पार पडले. गुरुवारी(दि. १५) पालखी सराटी येथील मुक्कामावरून पुढे पहाटे सहाच्या सुमारास अकलुजकडे रवाना झाली असती. सकाळची न्याहरी झाल्यानंतर पालखी अकलुजजवळ गोल रिंगण झाले असते. याच सोहळ्याचे प्रतिकात्मक रिंगण सोहळा मंदिराच्या आवारात पार पडला. हे रिँगण देखिल अश्वासह वारीतील  विणेकरी, पताका, तुळस, टाळ व मृदंग वादकांसह पार पडले. सध्या कोरोनाचा प्रादुर्भावामुळे शासनाने घालुन दिलेल्या निर्बंधांमुळे पायीवारी न होता प्रतिकात्मक वारी होत आहे. 

१ जुलैच्या पालखी प्रस्थानानंतर श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका येथील भजनी मंडपात ठेवून नित्योपक्रम सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणजे वारीच्या वाटचालीतील प्रतिकात्मक अश्वासह पहिले गोल रिंगण पार पडले. विठ्ठल रुख्मिणी मंदिरात पहाटे चार वाजता काकड आरती झाली. त्यानंतर श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर, नारायण महाराज समाधी मंदिर व वैंकुठगमन मंदिरात नित्यनियमाप्रमाणे महापूजा संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व पालखी सोहळा प्रमुख अजित महाराज मोरे, संजय महाराज मोरे, विश्वस्त संतोष महाराज मोरे आदीच्या उपस्थितीत संपन्न झाली.

 

श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना सकाळी ८ वाजता निरा नदीच्या पाण्याने इंद्रायणी नदी पाञात स्नान घातले. सकाळी अकरा वाजता मंदिरातील भजनी मंडळात भजनाला सुरूवात झाली. त्यानंतर सव्वा अकराच्या सुमारास पालखी मंदिराच्या आवारात प्रदक्षिणेसाठी बाहेर घेण्यात आली.यावेळी शिंगाडेवाले पोपट तांबे यांनी तुतारी वाजविताच उपस्थित सेवेकऱ्यांनी गरुड टक्के, अब्दागिरी, पताका व जरी पटका घेत आप आपल्या सेवेला सुरवात केली. त्यानंतर पालखीचे भोई यांनी पालखी खांद्यावर घेत मंदिराच्या आवारात आणली. 

दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पावले खेळ झाल्यानंतर वारीतील वाटचालीप्रमाणे उपस्थित वारकऱ्यांनी गोल रिंगण केले. तेथे काही काळ भजन करीत पावले फुगड्यांचाही डाव रंगला व गोल रिंगणाला सुरवात झाली. सर्व उपस्थित विणेकरी, पखवाज वादक, वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी, डोक्यावर तुळस घेऊन वारकरी भगिनी मंदिराच्या आवारात रिंगणात धाव घेतली. हे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसत होते. याचवेळी रिंगणात सेवेकऱ्यांनी अश्व आणला. घोडेस्वाराच्या खांद्यावर भगवी पताका घेऊन अश्व रिंगणात सोडण्यात आला. यावेळी वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करीत आनंद व्यक्त केला व अकलुजचे व वारीतील तिसरे गोल रिंगण सोहळा पार पडला व पालखी दुपारच्या विश्रांतीसाठी मंदिराच्या भजनी मंडपात विसावली.    

टॅग्स :dehuदेहूSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारीcorona virusकोरोना वायरस बातम्या