कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, हर्षवर्धन पाटलांचं गणरायाला साकडं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 03:36 PM2021-09-10T15:36:25+5:302021-09-10T15:36:33+5:30

इंदापूर येथील भाग्यश्री या निवासस्थानी पाटील कुटुंबीयांनी आज भक्तिमय वातावरणात 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' चा जयघोष करीत मांगल्याची देवता गणरायाचे स्वागत तसेच प्रतिष्ठापना केली.

The third wave of Corona should not come, Harshvardhan Patel's Ganaraya | कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, हर्षवर्धन पाटलांचं गणरायाला साकडं

कोरोनाची तिसरी लाट येऊच नये, हर्षवर्धन पाटलांचं गणरायाला साकडं

googlenewsNext
ठळक मुद्दे उत्साहात गणरायाचे स्वागत करून केली प्रतिष्ठापना

बारामती : महाराष्ट्रात कोरोनाची तिसरी लाट येऊ नये. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा. राज्यातील सर्व नागरिकांना सुखानं व आनंदानं जीवन जगता यावे, अशा शब्दात  भाजप नेते व माजीमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी गणरायाच्या चरणी साकडे घातले. 

इंदापूर येथील भाग्यश्री या निवासस्थानी पाटील कुटुंबीयांनी आज भक्तिमय वातावरणात 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' चा जयघोष करीत मांगल्याची देवता गणरायाचे स्वागत तसेच प्रतिष्ठापना केली.

संपूर्ण देश आज गणेशाच्या स्वागतासाठी उत्साही आहे. घरोघरी आज गणरायाची प्रतिष्ठापना केली जात  आहे. राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या घरी दरवर्षी मोठ्या उत्साहात गणरायाचे स्वागत करून प्रतिष्ठापना केली जाते. गणरायाच्या प्राणप्रतिष्ठा वेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील,  पत्नी भाग्यश्री पाटील, कन्या जिल्हा परिषद सदस्या अंकिता पाटील, मुलगा निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील उपस्थित होते.

Web Title: The third wave of Corona should not come, Harshvardhan Patel's Ganaraya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.