नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2021 10:25 PM2021-09-03T22:25:49+5:302021-09-03T22:25:58+5:30

पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध उठवण्यात आल्यामुळे नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला आहे.

Third wave will come due to negligence of citizens: Deputy Chief Minister Ajit Pawar | नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार 

नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे कोरोनाची तिसरी लाट येणार : उपमुख्यमंत्री अजित पवार 

Next

पुणे : पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंध उठवण्यात आल्यामुळे नागरिकांचा निष्काळजीपणा वाढला आहे. कुणीही नियमांचे पालन करतांना दिसत नाही. पुणे आणि पिंपरीच्या तुलनेत ग्रामीण भागाचा बाधित दर जास्त आहे. नियमांचे पालन होत नसल्यामुळे तिसरी लाट येण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. 

पुणे जिल्हा परिषदेच्या शरदचंद्र पवार सभागृहात महा आवास अभियान ग्रामणी पुरस्कार सोहळ्याचे वितरण अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, आरोग्य तज्ज्ञांनी तिसरी लाट येण्याचा इशारा दिला होता. यामुळे नागरिकांनी गांभीर्याने घेत नियमांचे पालन करावे. ग्रामीण भागातून कोरोना समुळ नष्ट करण्यासाठी या पुढे कार्य केले आहे. कोरोना नियंत्रणात जिल्हा परिषेदेने महत्वाची भूमिका बजावली आहे. या पुढेही असेच चांगले काम जिल्हा परिषद करेन असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

महा आवास योजनेमुळे जिल्ह्यात चांगल्या दर्जाची घरे बांधण्यात आली आहे. या योजनेमुळे खऱ्या अर्थाने गरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. येत्या काळात जिल्ह्यातील बेघरांना याद्वारे घरे देण्याचा प्रयत्न करणार, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, बांधकाम व आरोग्य सभापती प्रमोद काकडे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, महिला बालकल्याण सभापती पुजा पारगे, समाज कल्याण सभापती सारिका पानसरे, विभागीय आयुक्त सौरव राव, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यावेळी उपस्थित होते.

पवार म्हणाले, महा आवास योजने अंतर्गत घरांच्या कामाचा दर्जा राखण्यासाठी अधिकाऱ्यांना सुचना केल्या होत्या. घरे चांगली बांधली जावी या साठी गवंडीकामाचे प्रशिक्षण बेरोजगारांना देण्यात आले होते. याचा दुहेरी फायदा झाला. चांगल्या दर्जाची घरे निर्माण झाली आणि तरुणांना व्यवसायाचे प्रशिक्षण मिळाले. बांधकाम व्यवसायाला सध्या चांगले दिवस आहे. त्यामुळे चांगली घरे बांधून चरितार्थ करावा. या अभियानातून बेघर असलेल्यांना लाभ मिळाला. ज्यांना ही घरे मिळाली आहे. त्यांनी या घरांची चांगली निगा राखावी. आजची परिस्थीती पाहता परिसर स्वच्छ ठेवावा. जेणे करून रोगराई दूर राहील, असे आवाहन पवार यांनी यावेळी लाभार्थ्यांना केले.

लसीकरण महत्वाचं... 
कोरोनाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी लसीकरण महत्वाचे आहे. जिल्हा परिषदेने एकाच दिवसांत अडीच लाख नागरिकांना लस देऊन विक्रम केला आहे. या साठी बजाज समुहाचे मोठे सहकार्य मिळाले. येत्या काळात जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण्क रन्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

Web Title: Third wave will come due to negligence of citizens: Deputy Chief Minister Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.