विशाल शिर्के
पुणे : कोरोना विषाणूचा जगभर वेगाने फैलाव होत असून, लवकरच बाधितांचा आकडा वीस लाखांच्या पार जाईल, अशी स्थिती आहे. इटली, ब्रिटन, फ्रान्स, बेल्जियम या देशांमधील बाधितांचा आकडा वेगाने वाढत असून, शंभर बाधितांमागे १३ जणांचा मृत्यू होत आहे. बाधितांची सर्वाधिक संख्या असलेल्या अमेरिकेतील मृत्यूदर देखील दीडवरून साडेचार टक्क्यांपर्यंत वाढला आहे; तसेच येथील मृतांचा आकडा गुरुवारी २८ हजार ३२६ वर पोहोचला आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २१३ देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे, तर गुरुवारी दुपारी बाधितांचा आकडा १९ लाख २५ हजारांवर गेला होता. शुक्रवारी बाधितांचा आकडा २० लाखांचा आकडा गाठेल असे चित्र आहे. मृतांची संख्या सव्वालाखावर गेली आहे. प्रथितयश जॉन हॉपकिन्स विद्यापीठाच्या रिसोर्स सेंटरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अल्जेरियाचा मृत्यूदर सर्वाधिक १५.६ टक्के आहे. येथील बाधितांची संख्या २,१६० असून, त्यापैकी ३३६ जणांचा मृत्यू झाला आहे. खालोखाल बेल्जियममध्ये ३३,५७३ बाधित असून, १३.२ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमधील एक लाख रुग्णापैकी १३ आाणि इटलीतील १ लाख ६५ हजार रुग्णांपैकी १३.१ टक्के रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहे. फ्रान्समध्ये देखील १ लाख ३४ हजार बाधितांपैकी १२.८ टक्के रुग्णांना मृत्यूने गाठले आहे.स्पेनमध्येदेखील पावणेदोन लाख रुग्णांपैकी साडेदहा टक्के रुग्ण दगावले आहेत. अमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या ६ लाख ३६ हजारांवर गेली आहे. येथील मृतांची टक्केवारी साडेचार टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तब्बल २८ हजार ३२६ अमेरिकन व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे. खालोखाल इटलीमधे २१ हजार ६४५ व्यक्ती मृत पावल्या आहेत. भारतातील बाधितांचा आकडा १२ हजारांवर गेला असून, त्यापैकी ४०५ रुग्ण (३.३ टक्के) मरण पावले आहेत.जगभरातील देशांचा गुरुवार अखेरचा बाधितांचा मृत्यूदरदेश मृत्यूदरअमेरिका ४.५इटली १३.१स्पेन १०.५फ्रान्स १२.८ब्रिटन १३इराण ६.३बेल्जियम १३.२जर्मनी २.८चीन ४नेदरलँड ११.१तुर्की २.२भारत ३.३स्रोत : जॉन हॉपकिन्स विद्यापीठस्पेन, बेल्जियममध्ये लाखामागे मृतांची संख्या अधिकपावणेदोन लाखांवर बाधितांची संख्या असलेल्या स्पेनमध्ये शंभरामागे मृत पावणाऱ्या व्यक्तींचा टक्का १३.१ असून, एक लाख लोकसंख्येमागे ४० लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. खालोखाल बेल्जियममधील एक लाखामागे ३९, इटलीमध्ये ३६, फ्रान्समध्ये २५, ब्रिटनमध्ये २० आणि अमेरिकेतील ९ व्यक्तींचा मृत्यू झाला. चीनमध्ये बाधितांचा आकडा ८३,३५६ असून, मृतांची टक्केवारी ४ आहे; तसेच लाख लोकसंख्येमागे मृत्यूदर अवघा ०.२४ टक्के आहे.