पुणे : दरवर्षी प्रमाणे यंदाही पुण्यातील संभाजी बागेमध्ये पुणे महानगरपालिका व वृक्षप्राधिकरणाच्या वतीने किल्ले तयार करण्याच्या स्पर्धेचे तसेच प्रदर्शनाचे अायाेजन केले अाहे. यात तरुणांनी उत्फुर्त सहभाग घेतला. या स्पर्धेत तीस संघांनी भाग घेतला असून शिवाजी महाराजांच्या तीस विविध किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्यात अाल्या अाहेत. त्यामुळे शिवरायांच्या स्वराज्याची महती सांगणाऱ्या तीस किल्ल्यांची प्रतिकृती एकाच छताखाली नागरिकांना पाहता येणार अाहेत.
दरवर्षी पुणे महानगरपालिकेकडून दिवाळीमध्ये संभाजी बागेमध्ये किल्ले बनविण्याची स्पर्धा अायाेजित केली जाते. यंदा या स्पर्धेचे 26 वे वर्ष असून यंदा तीस संघांनी सहभाग घेतला. शिवाजी महाराजांच्या तीस किल्ल्यांच्या हुबेहुब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात अाल्या अाहेत. त्याचबराेबर त्या किल्ल्याची माहिती तसेच शिवाजी महाराजांच्या शाैर्याची कहाणीसुद्धा या ठिकाणी देण्यात अाली अाहे. या नुसत्या प्रतिकृती नसून प्रत्येक किल्ल्यांची भाैगाेलिक रचना कशा पद्धतीने अाहे याची माहिती मिळविण्याचे उत्तम ठिकाण अाहे. या प्रदर्शनात रायगड, सिंहगड, जंजीरा, प्रतापगड, पुरंदर, विजयदुर्ग असे अनेक किल्ले पाहायला मिळतात. या स्पर्धेत पारिताेषिक मिळविण्यासाठी संघ खूप मेहनत घेत असतात. यंदाचे या प्रदर्शनाचे अाकर्षण म्हणजे गिरीप्रेमी संस्थेने तयार केलेली 8586 मीटर उंच असणाऱ्या माऊंट कांचनजुंगा या जगातील तिसऱ्या क्रमांकाच्या व भारतातील सर्वाेच्च शिखराची प्रतिकृती.
त्याचबराेबर संभाजी बागेत असलेल्या पुण्याची भाेगाैलिक अाेळख करुन देणाऱ्या शिल्पाला दिवाळी निमित्त सजविण्यात अाले अाहे. या शिल्पाच्या माध्यमातून पुणे शहाराची अाेळख नागरिकांना करुन देण्यात येते. हे किल्ल्यांचे प्रदर्शन 11 नाेव्हेंबर पर्यंत सर्वांना पाहण्यास खुले अाहे.