पुणे : वारजे परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या पंढरपूर तालुक्यातील चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून ४ लाख ५६ हजार रुपयांचा ३० किलो ४२० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. वारजेहून उत्तमनगरकडे जाणाऱ्या रोडवर गुरूवारी पहाटे ही कारवाई केली.संतोष निवृत्ती ननावरे (वय २६,रा. झेंडेगल्ली, पंढरपूर), विशाल विलास माळी (वय २५, बत्तीस खोल्या झोपडपट्टी, ता. पंढरपूर), योगेश उर्फ जॉकी अशोक वाघमारे (वय ३१, रा. महापूर चाळ,पंढरपूर) आणि नितीन दिनकर साळेकर (वय ३२, रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा) असे अटक केलेल्या चौघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागात गांजा विक्री सुरू आहे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकास मिळाली होती. त्यानुसार, अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरूवारी (२ आॅगस्ट) पहाटे पावणेतीन वाजण्याच्या वारजे परिसरात उत्तमनगर रोडच्या दिशेने जाणाऱ्या संशयिताची कार थांबविली आणि कारची डिकी उघडून तपासणी केली. त्यांच्याकडून पोत्यामध्ये ठेवलेला ३० किलो ४२० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी अविनाश शिंदे, प्रफुल साबळे, मनोज साळुंके, मनोज साळुंके, हेमंत वाघमारे, राहुल जोशी, महेंद्र पवार, विठ्ठल खिलारे आणि सचिन चंदन यांनी केले आहे.
वारजेत तीस किलो गांजा पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 9:37 PM
वारजे परिसरात गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या पंढरपूर तालुक्यातील चौघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली.
ठळक मुद्देगुरूवारी (२ आॅगस्ट) पहाटे पावणेतीन वाजण्याच्या वारजे परिसरात कारवाई ४ लाख ५६ हजार रुपयांचा ३० किलो ४२० ग्रॅम गांजा जप्त