पुणे जिल्ह्यातील हे ठिकाण जागतिक पर्यटन केंद्र होणार; अजित पवारांनी घेतली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 04:36 PM2023-09-21T16:36:45+5:302023-09-21T16:40:14+5:30

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली.

This place in Pune district kuswali pathar of mawal will become a world tourism center; Ajit Pawar held a meeting | पुणे जिल्ह्यातील हे ठिकाण जागतिक पर्यटन केंद्र होणार; अजित पवारांनी घेतली बैठक

पुणे जिल्ह्यातील हे ठिकाण जागतिक पर्यटन केंद्र होणार; अजित पवारांनी घेतली बैठक

googlenewsNext

पुणे - महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेला पुणे जिल्हा पर्यटनासाठीही प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक शनिवार वाडा, पर्वती डोंगररांगा आणि सिंहगड किल्ला यांसाह पुण्याच्या आजुबाजूलाही निसर्सरम्य ठिकाणं आहेत. त्यामुळे, राज्य सरकारकडून येथील पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यातच, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मावळ तालुक्यातील कुसवली पठार हे पर्यटनाचे केंद्र बनवण्यासंदर्भात बैठक घेतली. त्यालवेळी, मावळ येथील कुसवली पठाराला जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याचा निर्धार उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मावळ तालुक्यातील कुसूर (कुसवली) पठारावर जागतिक पर्यटन केंद्र बनविण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. मावळपासून नवी पनवेल आणि मुंबई कमी अंतररावर आहे. त्यामुळे या परिसरात पर्यटन विकासाला चांगला वाव आहे. परिसरात निसर्गसंपदाही मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे येथे जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र तयार करण्यासाठी जिल्हा विकास आराखड्यात या प्रकल्पाचा समावेश करावा, अशी सूचना अजित पवार यांनी बैठकीत केली. 

कुसूल येथील जागतिक पर्यटन केंद्रासाठी शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल. आराखडा तयार करण्याच्यादृष्टीने आवश्यक माहिती संकलीत करावी, लवकरच याबाबत पुणे येथे बैठक घेण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. या बैठकीस पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी, पर्यटन संचालक बी.एन.पाटील,  पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानेश्वर दाभाडे उपस्थित होते.

कुसवली पठार हे समुद्र सपाटीपासून ३ हजार मीटर उंचीवर असून साधारण १ हजार २०० एकरचा हा परिसर आहे. परिसराच्या एका बाजूस ठोकळवाडी तर दुसऱ्या बाजूस वडीवळे आणि शिरोता अशी धरणे आहेत. पठाराच्या शेवटी पश्चिम घाट आहे, अशी माहिती यावेळी संबंधितांकडून देण्यात आली.
 

Web Title: This place in Pune district kuswali pathar of mawal will become a world tourism center; Ajit Pawar held a meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.