Rahul Gandhi: यंदा राहुल गांधी एक दिवस पंढरीची वारी अनुभवणार; १४ जुलैला सहभागी होणार

By राजू हिंगे | Published: July 11, 2024 03:46 PM2024-07-11T15:46:15+5:302024-07-11T15:49:44+5:30

राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी होणार असल्यामुळे त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येणार

This year Rahul Gandhi will one day experience ashadhi wari Will participate on 14 July | Rahul Gandhi: यंदा राहुल गांधी एक दिवस पंढरीची वारी अनुभवणार; १४ जुलैला सहभागी होणार

Rahul Gandhi: यंदा राहुल गांधी एक दिवस पंढरीची वारी अनुभवणार; १४ जुलैला सहभागी होणार

पुणे: श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज (Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi) आणि श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यातील पायी वारीत राहुल गांधी १४ जुलै रोजी सहभागी होणार आहेत. यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी (Rahul Gandhi) एक दिवस वारी अनुभवणार आहेत.

श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज आणि श्रीसंत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj palkhi Sohala) यांची पालखी दरवर्षी पंढरपूरला जाते. पंढरपूरला जाणाऱ्या आषाढी पालखी सोहळ्यात ‘एक दिवस तरी वारी अनुभवावी’ हा उपक्रम राबविला जातो. या वारीत साहित्यिक, विचारवंत, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांचा सहभाग असतो.  या वारीत उपमुख्यमंत्री अजित पवार हे पायी चालले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी वारीचे स्वागत केले आहे.  
 
भारत जोडाे यात्रेच्या वेळी काँग्रेसचे नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभर दौरा केला होता. त्यानंतर लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधीही यंदा पंढरीच्या वारीत राहुल गांधी एक दिवस वारी अनुभवणार आहेत. राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी  होणार असल्यामुळे त्यांना हजारो वारकरी आणि जनसामान्यांपर्यंत पोहोचता येणार आहे. 

Web Title: This year Rahul Gandhi will one day experience ashadhi wari Will participate on 14 July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.