बारामती नगरपरिषद हद्दीतील 'या' गावात लोकप्रतिनिधी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा; 'रासप’ची ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 05:48 PM2021-05-11T17:48:02+5:302021-05-11T18:27:02+5:30

मॅरेथॉनपटू लता करे यांचे पती चिंचेच्या झाडाखाली दोन दिवस पडुन होते; रासपचा खळबळजनक आरोप...

In 'this'village in Baramati taluka, show the people's representative and get the prize of Rs. 1000; offer by Rashtriy samaj paksha | बारामती नगरपरिषद हद्दीतील 'या' गावात लोकप्रतिनिधी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा; 'रासप’ची ऑफर 

बारामती नगरपरिषद हद्दीतील 'या' गावात लोकप्रतिनिधी दाखवा अन् १ हजार रुपये बक्षीस मिळवा; 'रासप’ची ऑफर 

googlenewsNext

बारामती: बारामती नगरपरिषद परिसरात गेल्या एक वर्षांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. प्रत्येक ठिकाणी जो तो लोकप्रतिनिधी काम करताना दिसत आहे. मात्र, जळोची या गावात एखादा वगळता बाकी स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दर्शन जवळपास दुर्मिळच झाले आहे.त्यामुळे गावात लोकप्रतिनिधी दाखवा आणि १ हजार रुपये मिळवा,असे आव्हान राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अ‍ॅड. अमोल सातकर यांनी दिले आहे.

या लोकप्रतिनिधींची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे रासपच्या वतीने सांगण्यात आले. जळोची परिसरात कोरोनाचे संकट असताना लोकप्रतिनिधी अगदी गावात येतच नाही, असे म्हटले तरी चालेल. गावातील कोणाच्या काय अडचणी आहेत, कोणाला बेड मिळत नाही, कोणाला औषध नाही. गेल्या कित्येक दिवसापासुन जळोची प्राथमिक शाळेत कोविड सेंटर, लसीकरण केंद्र सूूरु करा ही मागणी आहे. तसेच गावात औषध फवारणी करा ही मागणी आहे. परंतु लोकप्रतिनिधी साधे बोलायला तयार नाहीत.गावाचा सोशल  मीडिया ग्रुप आहे. तिथे लोकप्रतिनिधी गावाच्या या विषयावर बोलायला तयार नाहीत, लोकप्रतिनिधी स्वत:चे अर्थकारण करण्यात,वाढदिवसाचे मेसेज करण्यात व्यस्त असल्याचा आरोप सातकर यांनी केला आहे.
———————————————
   ...करे यांचे पती चिंचेच्या झाडाखाली दोन दिवस पडुन होते....
बारामती येथील ७२ वर्षीय मॅरेथॉनपटु लता करे यांचे पती भगवान करे यांचे मंगळवारी(दि ४ मे) कोरोनाने निधन झाले.मात्र,त्यानंतर ७ दिवसांनी भगवान करे यांच्याबाबत राष्ट्रीय समाज पक्षाच्या तालुकाध्यक्षांनी धक्कादायक माहिती पुढे आणली आहे. त्यानुसार  भगवान करे हे हॉस्पीटल मधुन उपचार घेत असताना निघुन आले होते. दोन दिवस जळोची गावातील चिंचे च्या झाडा खाली पडून होते, तरी देखील नगरपरिषदेच्या लोकप्रतिनिधी यांचे गावाकडे लक्ष गेले नसल्याचा आरोप राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष अ‍ॅड अमोल सातकर यांनी केला आहे.
——————————————

Web Title: In 'this'village in Baramati taluka, show the people's representative and get the prize of Rs. 1000; offer by Rashtriy samaj paksha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.